Home चंद्रपूर धक्कादायक :-चंद्रपूरातील प्रख्यात डॉ. कुबेर यांच्या निष्काळजीपणामुळे गेला तरुण रुग्णांचा जीव, नातेवाईकांचा...

धक्कादायक :-चंद्रपूरातील प्रख्यात डॉ. कुबेर यांच्या निष्काळजीपणामुळे गेला तरुण रुग्णांचा जीव, नातेवाईकांचा आरोप ! 

रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश आणि केली तोडफोड, डॉक्टरांनी मानली हार पोलिसात नाही तक्रार !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर शहरातील प्रख्यात व नामवंत डॉ.कुबेर यांचे रुग्णायलात आज सकाळी उपचारादरम्यान एका तरुण रुग्णाचा मृत्यू झाला हा म्रुत्यु डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर्सवर आरोप लावले व रुग्णालय गाठून तेथील अतिदक्षता विभागाच्या मुख्य दाराचे काचे फोडून संताप व्यक्त केला. दिनांक २६मार्चला राकेश यादव नावाचा ३६वर्षिय युवक प्रक्रुती बरी नाही म्हणून उपचारार्थ दाखल झाला.त्याची तब्येत अधिक खराब झाल्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांस तात्काळ भरती होण्यांचा सल्ला दिला नंतर लगेच त्यास अतिदक्षता विभागात ठेवून त्याचेवर उपचार केले पण उपचार योग्य पद्धतीने न झाल्याने तब्बल ५ दिवस उलटून सुद्धा बिमारिचे योग्य निदान डॉक्टर्स काढू शकले नसल्याने उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी म्रुत्यु झाला, मूत्यूची बातमी बाहेर पडताच काही नातेवाईकांनी रुग्णालयात येवून आपला आक्रोश व्यक्त केला आणि डॉक्टर्सवर निष्काळजीपणामुळेच म्रुत्यु झाल्याचा आरोप करून रुग्णालयात तोडफोड केली परंतु आता आपली पोलखोल होईल या भितीने पोलिसांना पाचारण करून म्रुतकाच्या नातेवाईकांना शांत करण्यात आले. विशेष म्हणजे या रुग्णालयात काही महिन्यांपूर्वी अश्याच एका रुग्णांचा म्रुत्यु झाल्याचे बोलल्या जात आहे.

Previous articleक्राईम स्टोरी :- चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन गुन्हे पथकाने पकडले अट्टल चोर, मुद्देमालासह केली अटक !
Next articleइंग्रजी माध्यमांच्या सर्व खाजगी शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची पुढील तीन महिन्याची फी माफी करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here