Home चंद्रपूर इंग्रजी माध्यमांच्या सर्व खाजगी शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची पुढील तीन महिन्याची फी माफी...

इंग्रजी माध्यमांच्या सर्व खाजगी शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची पुढील तीन महिन्याची फी माफी करा.

चंद्रपूर मनविसेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन !कोरोनाच्या संचारबंदीत पालकांचे आर्थिक नुकसान होतं असल्याने शासनाने या गंभीर बाबींवर तत्काळ निर्णय घेण्याची मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांची मागणी !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

देशातील कोरोनाच्या आजाराच्या फैलावामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू असून इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत सर्व शाळांना शासनातर्फे सुट्टी जाहीर करून यावर्षी अशा विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होनार नसून त्यांना येणाऱ्या शैक्षणिक वर्षात पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल असे शासनातर्फे जाहीर करण्यात आले. मात्र इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाची पूर्ण फी विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात येत असल्याने पुढील वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेत पालकांकडून फी घेतल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही असे विशेष सूत्रांकडून कळते, अगोदरच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये वाढलेली वारेमाप फी आणि त्यातच मध्यमवर्गीय असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना संचारबंदीत होतं असलेले आर्थिक नुकसान बघता ते शाळांची फी यावर्षी देवू शकणार नाही, त्यामुळेच राज्यस्तरावर निर्णय घेवून चालू शैक्षणिक वर्षाची विद्यार्थ्यांची फी माफ करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here