Home वरोरा शोकांतिका :-वरोरा शहरात डॉक्टरांनी हॉस्पिटल बंद ठेऊन गुन्हा केला असतांना त्यांचा निषेध...

शोकांतिका :-वरोरा शहरात डॉक्टरांनी हॉस्पिटल बंद ठेऊन गुन्हा केला असतांना त्यांचा निषेध करणाऱ्यावरच गुन्हा कां ?

डॉक्टरांनी  जिल्हाधिकारी आणि शासनाच्या आदेशाची पायमल्ली केल्याने ते गुन्ह्यस पात्र,आहे त्याची  पोलिसांनी चौकशी करावी-सुशिक्षित जनतेची मागणी !

वरोरा प्रतिनिधी :-

संपूर्ण जगात आणि भरतात सुद्धा कोरोना या जीवघेण्या व्हायरसमुळे जनतेला संचारबंदीला सामोरे जावे लागत असतांनाच डॉक्टर्स हे या घडीला रुग्णांचे देव बनले आहे, जगात डॉक्टर्स सेवा देतांना स्वतः या कोरोना व्हायरसमुळे मरण पावले आहे, मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा या शहरात डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्षच पळकुटेपणा करीत असल्याने त्या शहरातील काही सुशिक्षित नागरिकांनी ज्याअर्थी शासनाने व जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात रुग्णालये सुरू ठेवण्याबाबत आदेश काढले होते.पण त्या आदेशाला वरोरा येथील डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र ढवस यांनी केराची टोपली दाखवून व स्वतः कायदा हातात घेवून संचारबंदीतही शहरातील हॉस्पिटल बंद ठेवण्याचे आदेश सर्व डॉक्टरांना दिले होते, खरं तर कोरोना संकटाच्या वेळी जिथे जगातील डॉक्टर्स आपली अमूल्य सेवा देत असतांना वरोरा येथील डॉक्टर्स कोरोनाच्या भितीने स्वतःच्या घरी बसून एक प्रकारे देशद्रोह करीत होते, कारण त्यांना देशांपेक्षा स्वतःचा जीव महत्वाचा होता, मग कुणी प्रकृती बिघडून मेले तरी चालेल आणि म्हणूनच शहरातील सर्व पक्षीय मित्र मंडळ यातील सदस्यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन दिले व डॉक्टर्स असोसिएशनच्या हॉस्पिटल बंद ठेवण्याचा निषेध करून शासनाने अत्यावश्यक सेवेत हॉस्पिटल सुरू ठेवण्याचे आदेश दिले असतांना सुद्धा डॉक्टर्स कडून हॉस्पिटल बंद करणे हा गुन्हा आहे त्यामुळे त्यांचेवर कारवाई करावी अशी मागणी केली होती.आणि या गोष्टीचा निषेध जाहीरपणे करून तसे शहरात बैनर शहरात लावले होते. मात्र संचारबंदीत कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी डॉक्टर्स असोसिएशनच्या तक्रारी वरून उलट सर्वपक्षीय मंडळ पदाधिकारी वैभव डहाणे आणि मनीष जेठानी यांच्यावरच पोलिस विभागाने प्रतिबंधक कारवाई केली जी अत्यंत चुकीची आणि जनतेच्या हक्क अधिकारासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोधर्य खच्चीकरण करणारी आहे अशी सर्वत्र चर्चा आहे. विशेष म्हणजे ज्या डॉ. राजेंद्र ढवस यांनी शहरातील डॉक्टरांना हॉस्पिटल बंद ठेवण्याचे आदेश दिले त्यावेळी त्यांनी किती डॉक्टरांना विश्वासात घेतले आणि यासाठी त्यांनी बैठक घेवून हा विषय मंजूर करून घेतला कां ? ही बाब सुद्धा खऱ्या अर्थाने चिंतेची आणि चिंतनाची आहे. यादरम्यान जेंव्हा पोलिस विभागाने वैभव डहाणे आणि मनीषा जेठानी यांना बोलवून कबुली जबाब घेतल्या त्यात त्यांनी याबाबत
कबुली पत्रात बॅनर लावण्याचा तसेच सोशल मीडियावर प्रकाशित करण्याची कबुली  केली आहे. असे लिहून दिले व माझ्यासह तसेच शासनाचे निर्देश तथा माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला न जुमानता हॉस्पिटल बंद ठेवल्यामुळे डॉक्टरांवर देखील योग्य ती कारवाई करण्यात यावी असे म्हटले होते. परंतु पोलिसांनी डॉक्टरांना वाचवून सामाजिक दायित्व निभविनाऱ्या वैभव डहाणे आणि मनीष जेठानी वर प्रतिबंधात्मक कारवाई केली, जी चुकीची आणि सर्वसामान्यांचा आवाज दाबणारी आहे, त्यामुळे पोलिस प्रशासनाने याबाबत फेरविचार करावा व सर्वसामान्यांच्या हक्क अधिकारासाठी लढणाऱ्याना साथ द्यावी अशी मागणी होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here