प्रत्त्येक कुटुंबाला मिळणार पास, मात्र वार्डातच राहण्याची अट. बाहेरच्या वार्डात गेलात तर होणार गुन्हा दाखल !
बल्लारपूर प्रतिनिधी :-
शहरातील प्रत्येक कुटुंबाला बल्लारपूर नगरपरिषद कडून नागरिकांना पास मिळणार असून नागरिकांनी त्यांच्या वार्डातच राहावे व ५ दिवसातुन एकदाच खरेदी करीता बाहेर पडावे आणि जिवनावश्यक वस्तु घरपोच सुविधा देणा-या दुकानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान बल्लारपूर नगरपरिषद तर्फे नागरिकांना करण्यात आले.
कोराना (कोव्हीड १९) विषाणुचा प्रादृर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन घोषीत करण्यात आलेले आहे. जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे आदेशानुसार या कालावधीत नागरिकांना अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आलेला असल्यामुळे शासनाने नगर परिषद बल्लारपूर क्षेत्रातील प्रत्येक वार्ड नुसार अंगणवाडी सेविकेचे पथक तयार करण्यात आले असून नगर परिषद शाळेचे शिक्षक यांना पर्यवेक्षक म्हणुन नेमणुक करण्यात आली आहे. नगर परिषद बल्लारपूर वतीने नागरिकांना तारीख निहाय पास वितरणाचे वाटप अंगणवाडी सेविके मार्फत करण्यात येणार आहे. ही पास प्रत्येक कुटुंबाला अत्याआवश्यक वस्तु घेण्याकरीता ५ दिवसातुन एकदा आपल्या वार्डात सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यत वापरण्याकरीता देण्यात येत असून या सोबत आधार कार्ड किंवा अन्य कोणतेही ओळखपत्र ठेवणे बंधनकारक राहील. या नियमाचे पालन न केल्यास सदर पास जप्त करुन कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तसेच पास जप्त झाल्यास किंवा पास हरविल्यास पुन्हा प्रदान करण्यात येणार नाही. या पास सोबत नगर परिषदेने तयार केलेल्या होमडिलिव्हरीद्वारे किरणा दुकान व मेडीकल स्टोअर्स यांची यादी प्राप्त असून त्यानुसार नागरिकांना त्या वाडात पुरविण्यात येईल.
दिनांक ०३/०४/२०२० रोजी पास वाटपाचे काम करतांना पर्यवेक्षक व अंगणवाडी सेविका यांचे स्वसुरक्षितेकरीता मास्क, सॅनिटाईजर, नॉदणी साठी रजिस्टर इत्यादी सामुग्री नगर परिषद मार्फत नाटयगृह येथील कार्यक्रमा दरम्यान वाटप करण्यात आले. सदर पथकांकडून सर्व वार्डामध्ये पास वितरणाचे काम लवकरात लवकर पुर्ण व्हावे व नागरिकांची गैरसोय संपवावी. या उददेशाने बाल विकास प्रकल्प अधिकारी थेठे यांनी सर्व पथकांना मार्गदर्शन दिले तसेच कार्याक्रामांच्या अध्यक्ष विपिन मुदधा, मुख्याधिकारी, नगर परिषद बल्लारपूर यांनी कोणतेही कुंटुंब पास पासुन वंचित राहु नये. असे निर्देशित केले..
नगर परिषद बल्लारपूर
(पास वापरण्याच्या अटी शर्ती)
आपल्या वार्ड व्यतिरिक्त इतर वार्डात आढळल्यास तसेच इतर तारखेला निघाल्याचे आढळल्यास भा.द.वी कलम १८८ अन्वये होणाऱ्या कारवाई पात्र राहाल आणि पास जप्त करण्यात येईल.
पास आणि आधारकार्ड/ओळखपत्र असल्या शिवाय बाहेर पडू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल.
पास हरवल्यास किंवा जप्त केल्यास दुसरा पास मिळणार नाही.
कुठल्याही बाबतीत तक्रार असल्यास खाली दिलेल्या टोल फ्री नंबर संपर्क साधावा © 80083307339 9130052358 असे आव्हान करण्यात आले आहे.