Home राष्ट्रीय सावधान :-देशात कोरोना संकटावर विजय मिळविण्यासाठी ४९ दिवसाचा लॉक डाऊन होणार ?

सावधान :-देशात कोरोना संकटावर विजय मिळविण्यासाठी ४९ दिवसाचा लॉक डाऊन होणार ?

कोरोना संपवायचा असेल तर ४९ दिवस लॉक डाऊन करावा लागेल,  केंब्रिज विद्यापीठात कार्यरत राजेश सिंग आणि आर. अधिकारी या दोन भारतीय वंशाच्या संशोधकांचा दावा,

कोरोना अपडेट :-

कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन पाळण्यात आले आहे. मात्र तरीदेखील देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. त्यामुळे २१ दिवसांचे लॉकडाऊन पुन्हा काही दिवसांसाठी वाढवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तसेच या लॉकडाऊनवर केम्ब्रिज विद्यापीठातील भारतीय वंशाच्या दोन संशोधकांनी आपले मत व्यक्त केलं आहे.त्यांच्या मते, भारताला अजून 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज आहे. 49 दिवसांच्या लॉकडाऊननंतर भारतातील कोरोनाचे रुग्ण कमी होतील.

राजेश सिंग आणि आर. अधिकारी असे या दोन संशोधकांचे नाव आहे. राजेश सिंग आणि आर. अधिकारी या दोन भारतीय वंशाच्या व्यक्ती प्रसिद्ध केंब्रीज विद्यापीठामध्ये अप्लाईट मॅथेमॅटिक्स विभागामध्ये काम करतात. गणितीय आकडेमोड करून त्यांनी 21 वरून हा कालावधी 49 दिवसांचा केला तर कोरोनाला हरवणं भारताला अधिक सोपं जाईल, असा निष्कर्ष काढला आहे. भारताने कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवावं यासाठी या दोन संशोधकांनी काही थेअरीज मांडल्या आहेत,
सध्या 21 दिवसांच्या लॉकडाऊच्या काळात कोरोनावर नियंत्रण मिळवणं शक्य होईल पण आटोक्यात येईल, असं म्हणण धाडसाचं होईल. 21 दिवसांच्या लॉकडाऊन नंतर पुन्हा कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते, असा त्यांच्या संशोधनाचा निष्कर्ष आहे. सलग 49 दिवसांचा लॉकडाऊन घेतला तर कोरोनाबाधितांची संख्या 10 च्या खाली येईल, असं त्यांच्या अभ्यासाअंती त्यांनी निष्कर्ष काढला आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here