Home चंद्रपूर ब्रेकिंग न्यूज :-नॉट फॉर सेल सिमेंट चोरीत अडकलेले राजू रेड्डी आता अन्नधान्य...

ब्रेकिंग न्यूज :-नॉट फॉर सेल सिमेंट चोरीत अडकलेले राजू रेड्डी आता अन्नधान्य वाटपात अडकले ?

घूग्गूस येथील गरीब महिलांनी राजू रेड्डी यांच्यावर वेकोलितून मिळणाऱ्या अन्नधान्याची अफरातफर करण्याचा केला आरोप!

घूग्गूस प्रतिनिधी :-

स्वतःला समाजसेवक समजणारे काँग्रेस कमेटी घूग्गूस शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांनी एसीसी सिमेंट कंपनीच्या नॉट फॉर सेल सिमेंट बैगा खुल्या मार्केटमधे विकल्या प्रकरणी घूग्गूस पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल झाला होता. शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी एसीसी सिमेंट कंपनीच्या या प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी केल्याने महाराष्ट्र शासनाने सीआयडी चौकशी सुरू केली होती, ते प्रकरण ताजे असतांना आता कोरोनाच्या या संकटात एकीकडे जात पात धर्म भेद बाजूला सारून सर्व स्तरातुन गोरगरिबांना लॉकडाऊनच्या या काळात अन्नधान्य पुरवठा अनेक कंपन्या आणि संस्था करीत आहे. मात्र घूग्गूस परिसरातील गरीब जनतेला वेकोलीकडून जे मदत अन्नधान्य स्वरूपात मिळत आहे त्याची जबाबदारी राजू रेड्डी यांनी घेतल्याचे कळते परंतु त्यांनी घूग्गूस शहरातील अनेक वार्डात गोरगरिबांना मदत कार्य पोहचवीले नसल्याची ओरड सर्वसामान्य गरीब जनता करीत असून राजू रेड्डी यांनी वेकोलीतून मिळालेल्या अन्नधान्याची अफरातफर केल्याचा आरोप महिलांनी केला असल्याने या गंभीर प्रकरणी प्रशासनाने मध्यस्थी करून राजू रेड्डी यांच्यावर कारवाई करावी व गोरगरिबांना अन्नधान्याचे वाटप करावे अशी मागणी घूग्गूस येथील अन्नधान्यापासून वंचित महिला करीत आहे.

Previous articleधक्कादायक :- भाजपच्या वर्धापनदिनाच्या पूर्व संध्येला दिवे उजळण्याचे मोदींचे छडयंत्रकारी आव्हान !
Next articleब्रेकिंग न्यूज :- मोदींच्या दिमाखाची बत्ती ऊर्जामंत्री नितीन राऊत ने केली गुल ? आता पूर्ण लाईट होनार नाही बंद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here