मोदींचे घाणरडे राजकारण आले समोर , कोरोनावर काय उपाययोजना ? याचा पत्ता नाही, कुठलीही ठोस मदत जनतेसाठी नाही, गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ, मात्र भाजपचा वर्धापन दिन पूर्व संध्येला साजरा करण्याचे मोदींचे छडयंत्र ?
लक्षवेधी :-
सध्या देशावर कोरोना व्हायरसमुळे मोठे संकट आले असून भारतात कोरोना पॉझिटिव्हचा २ हजाराचा आकडा तर एकट्या महाराष्ट्रात तो आकडा ५०० पेक्षा जास्त झाला आहे.त्यामुळे आता देशातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढता आकडा कसा कमी करता येईल व त्यासाठी युद्धस्तरांवर काय उपाययोजना आपल्याला करता येईल यांवर मोदी सरकारने प्रयत्न करायला हवे होते. सोबतच देशात लावलेल्या संचारबंदीमुळे अडकलेल्या कामगार. मजूर व इतर लोकांना काय मदत सरकारतर्फे करण्यात येत आहे याबद्दल पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी देशातील जनतेला सांगणे अपेक्षित होते, मात्र ज्या
भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिन ६ एप्रिलला आहे त्या वर्धापन दिनाच्या पूर्व संध्येला कोरोना च्या पार्श्वभूमीवर जणू पक्षाच्या वर्धापन दिनाचा जल्लोष करण्याचे आव्हान हे छडयंत्रकारी नाही कां ? असा प्रश्न आता सामाजिक कार्यकर्त्यांना पडला आहे, हे छडयंत्र नेमकं काय आहे ? हे जरा समजून घेणं महत्वाच आहे.
मोदींची क्रोनोलॉजी काय आहे ?
जनसंघाचे निवडणूक चिन्ह दिवा होता, ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राजकिय दिपक पेटवला, नंतर ५ एप्रिल १९८० ला जनसंघाचे नामकरण भारतीय जनता पक्षात झाले.आणि दिनांक ६ एप्रिलला भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणने आहे की जनसंघाच्या दिव्यांनीच भाजपचे कमळ फुलले आहे. यावर्षी ६ एप्रिलला भाजपचा ४० वा वर्धापन दिवस आहे.त्यामुळे भाजपच्या वर्धापन दिवसांच्या पूर्व संध्येला लोकांकडून भाजपच्या उदयाचा आणि जनसंघाच्या स्म्रुतीचा ऐतेहासिक जल्लोष करण्यासाठी दिवा लावण्याचे आव्हान पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी करून भारतीय जनतेला मूर्ख बनविले आहे हे आता उघड दिसत आहे.नाहीतर त्या कोरोना आणि दिवा लावणे याचा काय सबंध आहे ?
एकीकडे देशात कोरोना व्हायरसमुळे भुखमरी, बेकारी आणि लाचारी जिकडे तिकडे दिसत असतांना त्यावर केंद्र सरकारकडे कुठलीही ठोस उपाययोजना दिसत नाही आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे स्वतःच्या पक्षांच्या वर्धापन दिवसांच्या पूर्व संध्येला दिवा पेटवून जल्लोष साजरा करीत असेल तर तो दिवा पेटवण्यापेक्षा गरिबांच्या घरी जी चूल पेटत नाही ती चूल पेटवीण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे असे तांत्रिक द्रुष्टीने महत्वाचे वाटते.
खरं तर , देशात आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे. ती एवढी भयावह आहे की ज्या पद्धतीने कुठलीही पूर्व तयारी न करता मोदींनी नोटाबंदी केली आणि बैंकेसमोर पैसे काढण्यासाठी रांगेत असणाऱ्या १२० पेक्षा जास्त नागरिकांना आपला जीव द्यावा लागला. नव्हे मोदी सरकारने त्यांची एक प्रकारे हत्त्याच केली होती. आज तशाच प्रकारची कुठलीही प्राथमिक उपाययोजना न करता व देशात विदेशात अडकलेल्या लोकांना कुठलीही स्वतःच्या घरी जायची संधी न देता संचारबंदीचा निर्णय मोदींनी जाहीर केला. तो अत्यंत चुकीचा व देशातील जनतेला वेठीस धरणारा आहे. पण एवढे करून सुद्धा आतापर्यंत भारतीय जनतेला कुठलीही ठोस मदत पोहचली नाही,
सध्या देश कोरोनोच्या विळख्यात अडकला आहे. या विषयी काय उपाययोजना केली आहे. या विषयी पंतप्रधान यांनी देशाला संबोधन केलेल्या भाषणातून माहिती हवी होती. संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण कसं करावं , अचानक केलेल्या लाॅकडाऊन मुळे लाखो मजूरांना शेकडो किलोमीटर अंतर पायपीट कराव लागले आहे. कोट्यवधी जनता भुकेनी व्याकूळ झाली आहे.
अश्या आणिबाणी प्रसंगी आपले प्रधानमंत्री तर दिपोत्सव साजरा करण्याबाबत आवाहन करत आहेत. कोरोना आजार आणि दिवा लावणे याचा आपसात कांही संबंध नाही. त्यांना या आडून दि ६ एप्रिल २०२० रोजीच्या भाजपच्या वर्धापन दिनाच्या पूर्व संध्येला दिवा जाळून जल्लोष करायचा आहे.
याना देशातील अस्वस्थतेची, गरिबांच्या अन्नाची, अडकलेल्या भाविकांची काळजी नाही तर आपल्या राजकिय पक्षाचा वर्धापन दिन यांना अशा परिस्थितीत साजरा करण्याची बुद्धी कशी येते ? हा प्रश्न चिंतेचा आणि चिंतनाचा आहे.