Home चंद्रपूर खळबळजनक :-39 वर्षीय चंद्रपूरचा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न !

खळबळजनक :-39 वर्षीय चंद्रपूरचा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न !

नागपूर येथे आमदार निवासात  विलगिकरण कक्षात ठेवन्यात आले होते.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

39 वर्षीय चंद्रपूर येथील असलेला रुग्ण हा नागपुरात कोरोना पॉझिटिव आढळून आला आहे. हा रुग्ण इंडोनेशिया येथे काही लोकांसोबत गेला होता,त्यानंतर तो 22 मार्चला नागपूर येथे पोहोचला, या अगोदर इंडोनेशिया ते दिल्ली आणि दिल्ली ते नागपूर असा त्यांचा प्रवास होता. त्यामुळे त्यांना त्यादरम्यान कोरोनाचा संसर्ग झाल्याचे त्यांच्या तपासणीनंतर दिसून येते.

नागपूर येथे त्याची चौकशी व त्याची वैद्यकीय चाचणी झाल्यावर त्याला MLA हॉस्टेल येथे विलगिकरण करण्यात आलेले होते, व त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, तपासणीचा अहवाल आल्यानंतर हा रुग्ण पॉझिटिव्ह आढल्याने खळबळ उडाली आहे.त्यामुळे नागपुरात कोरोना बाधितांची एकूण संख्या 18 झाली आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती चंद्रपूर येथील असल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे आता प्रशासनात चांगलीच खळबळ उडालेली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांना पत्रकारांनी माहिती विचारली असता चंद्रपूर जिल्ह्याचा नागरिक असणारा एक व्यक्ती विदेशातून आल्यापासून नागपूरला इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाईन होता. तो चंद्रपूरमध्ये आलाच नाही. सदर व्यक्ती हा कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे वृत्त आहे. मात्र त्याचा सध्या चंद्रपूरशी कुठलाही संबंध नाही असे ते म्हणाले.

Previous articleब्रेकिंग न्यूज :-गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षांचा निर्णय होणार उद्या जाहीर ?
Next articleमोदींचे धक्कादायक तंत्र, कोरोनाच्या संकटातही पक्षांच्या वर्धापनदिनानिमित्त दिवाळी केली साजरी ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here