मोदींनी मुर्खांची संख्या वाढवली? पक्षाचा वर्धापन दिन जनतेच्या दिव्यांतून व फटाके फोडून व जनतेला मूर्ख बनवून केला साजरा, इकडे कोरोनावर उपाययोजना शून्य, देशात सर्वत्र फसलेल्या नागरिकांच्या स्थलांतराचा प्रश्न, वैद्यकीय साहित्याचा अभाव मात्र थाळ्या वाजवणे व दिवा लावणे हाच मोदीकडे पर्याय ?
लक्षवेधी :-
देशात कोरोनाचे महाभयानक संकट समोर असतांना पंतप्रधान म्हणून नरेन्द्र मोदी यांनी खरं तर देशातील जनतेला धीर देऊन आपण कोरोना व्हायरसच्या प्रकोपाशी कसे लढत आहो. आपण किती मास्क आणि वेंटीलेटर सोबतच टेस्टिंग किट उपलब्ध केल्या. देशातील हॉस्पिटलमधे किती पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विट्मेण्ट उपलब्ध केल्या, देशातील सर्वत्र जागोजागी अडलेल्या कामगार मजूर व इतर लोकांना काय मदत देत आहो. लॉक डाऊनमुळे देशातील कोट्यावधी लोकांचे रोजगार गेले, कामगार मजूर घरी बसले. शेतकरी घरी आहे. छोटेमोठे दैनिक काम करणारे लोक घरी आहे आणि त्यांना आता घरात चूल पेटणार कशी याची चिंता असल्याने त्यांच्यासाठी आर्थिक मदत आपण काय करीत आहो , याबाबत जनतेशी संवाद साधायला हवा होता. मात्र त्यांनी जनतेशी हितगुज करतांना आपले आदेश देत दिनांक २२ मार्चला जनसंघातून भारतीय जनता पक्षात सामील करण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंजुरीच्या दिवशी थाळी वाजवा तर दिनांक ५ मार्चला ९ वाजून ९ मिनिटांनी भारतीय जनता पक्षाला ४० वर्ष पूर्ण होण्याच्या दिवशी दिवा लावायचा आदेश दिला जो या देशातील तमाम बुद्धिजीवी लोकांच्या अस्मितेला, त्यांच्या स्वाभिमानाला धक्का पोहचवीणारा आहे.
मोदींच्या या शास्त्रीय तर्कसंगत नसलेल्या आदेशाने एकीकडे जनता मूर्ख बनली आणि दुसरीकडे जे विद्न्यानवादी आहे त्यांनी या आदेशाचा कडाडून विरोध केला. पण मोदी भक्तांनी मात्र कोरोनामुळे देशात मरण पावलेल्या नागरिकांच्या म्रुत्युवर एकच जल्लोष करून केवळ दिवेच लावले नाही तर फटाके सुद्धा फोडले, व मोदीचा उदोउदो करणाऱ्या प्रसारमाध्यमांनी जणू मोदीसोबत सगळा देश आहे आणि सर्व जनता एकजूट आहे असे चित्र निर्माण केले.
मोदी भक्तांना आणि सर्वसामान्य जनतेला मोदींच्या भाषणाचे व त्यांच्या आव्हानांचे गुपित अजून पर्यंत समजले नाही, कोरोनाचा थाळी बजावण्याशी किंव्हा दिवा लावण्याशी वैद्न्यानिक काही सबंध आहे कां ? याचे काही शास्त्रीय तर्कसंगत असे कारण समोर आले कां ? अर्थात असे काहीही नाही, केवळ यांचा निर्णय जनतेवर थोपवून यांना आपली चाल खेळायची आहे, पूर्व इतिहास बघता 22 मार्च 1980 ला सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी संघाच्या सरसंघचालक यांनी जनसंघाचे विलीनीकरण भारतीय जनता पक्षात करण्याची मंजुरी दिली व भाजप पक्षाची दिनांक 6 एप्रिल 1980 ला 9 वाजून 9 मिनिटांनी अधिकृत घोषणा करण्यात आली. त्या भाजपला 5 एप्रिलला 9 वाजून 9 मिनिटांनी पूर्ण 40 वर्ष होतं आहे, त्यामुळे 22 मार्च ला आपण थाळी बजावली , आता 5 एप्रिलला दिवा लावून भाजपच्या 40 वर्ष पूर्ण झाल्याचा जल्लोष करण्यात आला, मग सर्वसामान्य जनतेला मिळालं काय ? विशेष म्हणजे पंतप्रधान नरेन्द्र मोदींचा हा थाळी आणि दिव्यांचा इव्हेन्ट एक प्रकारे विक्रुत्तीचा, मानसिक दिवाळखोरी निघाल्याचे द्योतक आहे, परंतु मोदी भक्तांना याचे काही एक सोयरसुतक नाही, ते उलट मोदीच्या या भाकडकथा आणि निर्णय कसे योग्य आहे हे कुठलाही आधार नसतांना सामजिक माध्यमात पोस्ट टाकून जनतेची दिशाभूल करतात.
देशभरात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढच होत आहे. कोरोना विषाणूचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असून आकडा ४ हजार २८९ वर पोहचला आहे. तर ११८ जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत देशात कोरोनाबाधित ३२८ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशाला पुढील दोन महिन्यात २.७ कोटी एन-९५ मास्क आणि ५० हजार व्हेंटिलेटरची गरज भासणार आहे. पण याविषयी कुठलीही उपाययोजना जानतेपुढे मांडून जनतेला आश्वस्त करण्याचे सोडून स्वतःच्या राजकिय स्वार्थ साधणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी जनतेकडून करून एक प्रकारे जनतेला मूर्ख बनवायचे मोदींचे धोरण देशाच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारे आहे, मात्र जोपर्यंत मोदी सोबत अंधभक्त आहे आणि त्यांचा उदोउदो करणारी मिडिया आहे तोपर्यंत या देशात मोदी शासन ॲडॉल्फ हिटलर प्रमाणे या देशात राज्य करेल आणि अंधभक्त जणू गुलाम बनून मोदींचा जयजयकार करेन , आता तर थाळी वाजवायला आणि दिवे लावायला मोदींनी आपल्या भक्तांना लावले यानंतर “नमो! नमो! “चा “सामूहिक जप”,१०८ वेळा करा अशी सूचना येण्याची दाट शक्यता आहे. कोरोनाच्या संकटात इव्हेन्ट म्रूतकच्या घरी नाचगाण्याचा कार्यक्रम केल्यासारखे आहे. आता देशातील जनता किती बुद्धीजीवी आहे हा येणारा काळच ठरविणार आहे.