सहाय्यक पोलिस निरीक्षक दरेकर यांच्या नेत्रुत्वात केले कोम्बिंग ऑपरेशन !
चंद्रपूर प्रतिनिधी :-
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असली तरी दारूची आयात चोरट्या मार्गाने दारू तस्कर करीत असतात मात्र कोरोना व्हायरसमुळे जिल्ह्याशेजारी सर्व जिल्ह्यात सुद्धा देशी विदेशी दारूची दुकाने बंद केल्याने चंद्रपूरला दारू आयात करणे मोठे आव्हान आहे. मात्र मैद्यशौकिनाना आता विदेशी दारू मिळत नसल्याने त्यांचा कल हा मौवा दारूकडे वळल्याने पहिल्यांदाच मौवा दारूची मोठी मागणी कोरोना संचारबंदीत होतं आहे. अशातच मौवा दारूचे अड्डे असलेल्या लौहारा, घंटाचौकी आणि चीचपल्ली येथूनच मुख्य स्त्रोत असल्याने ते जर उध्वस्त झाले तर चंद्रपूर शहरात आणि जिल्ह्यात अवैध दारू विक्री होणे शक्यच नाही त्यामुळे मौवा दारूचे हे अड्डे रामनगर पोलिस स्टेशन मधील गुन्हे विभागाचे पोलिस सहाय्यक निरीक्षक दरेकर यांच्या नेत्रुत्वातील पथकाने नष्ट केले आणि जवळपास साडेचार लाखांची मौवा दारू पकडून ती नष्ट पण केली, ही करवाई पोलिस निरीक्षक प्रकाश हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दरेकर,, जाधव, मोहीतकर, कामडी, परचाकेव इतर पोलिस कर्मचारी या कोम्बिंग ऑपरेशनमधे सामील होते.