Home चंद्रपूर ब्रेकिंग न्यूज :-जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांचा तो महत्वपूर्ण निर्णय कां घेतला मागे...

ब्रेकिंग न्यूज :-जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांचा तो महत्वपूर्ण निर्णय कां घेतला मागे ?

अत्यावश्यक वस्तू प्रमाणे इतर वस्तूंचे दुकानेही सुरू करण्याचा झाला होता निर्णय !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

अत्यावश्यक वस्तूंप्रमाणेच इतर काही गोष्टींची दुकान आठवड्याच्या ठराविक दिवशी ठराविक वेळेसाठी सुरू करण्याचा निर्णय चंद्रपूर जिल्हाधिकारी व प्रशासनाने घेतला होता. हा निर्णय घेतल्याच्या अगदी 12 तासाच्या आतच तो मागे कां घेण्यात आला ? याबाबत ठोस असे कारण समोर आले नसले तरी लोकांची बाजारात, बैंकांसमोर उडालेली झुंबड यामुळे हा निर्णय मागे घेण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते.
संचारबंदीला थोडी सैल दिल्यानंतर मंगळवारी बाजारपेठ लोकांनी फुलून गेली होती यामुळे
संचारबंदीचे सर्रास उल्लंघन करण्यात येत होते.शिवाय शहरातील रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी मोठ्या प्रमाणावर दिसत होत्या. त्यामुळे परिस्थिती बिघडण्याची शक्यता प्रशासनाला दिसायला लागल्याने प्रशासनाने आपला तो निर्णय मागे घेत फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकानेच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी प्रशासनाने एक महत्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला होता. मात्र आता तो निर्णय मागे घेऊन लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सगळी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने मंगळवारपासून अत्यावश्यक सेवेच्या दुकान यांसह इतर काही वस्तूंची दुकानेही ठराविक वेळेत सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. 7 एप्रिलपासून 14 एप्रिलपर्यंत प्रायोगिक तत्वावर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार होती. प्रत्येक सेवेच्या दुकानासाठी आठवड्यातील एक वार निश्चित करण्यात आला होता आणि त्या-त्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेतच ही दुकाने सुरू राहणार होती. मात्र हा निर्णय मंगळवारीच जिल्हा प्रशासनाने मागे घेतला.
आठवड्यातील एक वार निश्चित करण्यात आला होता आणि त्या-त्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेतच ही दुकाने सुरू राहणार होती. मात्र हा निर्णय मंगळवारीच जिल्हा प्रशासनाने मागे घेतला.
चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. ही संपूर्ण जिल्ह्यासाठी आणि दिलासादायक आणि आनंदाची बाब आहे. यामुळे इतरही काही दुकाने सुरू करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला होता. हा निर्णय प्रायोगिक तत्तावर घेण्याचं ठरलं होतं. जर नव्याने सुरू होणाऱ्या दुकानांमुळे अनावश्यक गर्दी झाली तर या निर्णयावर फेरविचार होऊ शकतो असे प्रशासनाने आधीच स्पष्ट केले होते.

Previous articleब्रेकिंग न्यूज :-कोरोना संकटातही कोरपना येथे वाळु तस्करी जोरात ? 
Next articleमहाराष्ट्रासाठी मोठी बातमी:-सर्वाधिक वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याच्या यादीत महाराष्ट्राचे प्रमाण केवळ ४,४,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here