Home वरोरा दिन विशेष :-छोटूभाई शेख यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला कामगार दिन !

दिन विशेष :-छोटूभाई शेख यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला कामगार दिन !

महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त सफाई. कामगार पोलीस कर्मचारी , उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कामगार यांना त्यांनी लॉक डाऊन च्या काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल केला शाल श्रीफळ देवून सत्कार!

वरोरा प्रतिनिधी :-

जिल्हा काँग्रेस असंघटित कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपूर गडचिरोली असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष आणि वरोरा नगरपरिषद चे बांधकाम सभापती छोटूभाई शेख यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वांना सुरक्षा व सेवा देण्याऱ्या पोलीस शिपाई व सफाई कामगारांच्या उत्क्रुष्ट कार्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात केला.
सध्या देशात, राज्यात, जिल्ह्यात व तालुक्यात कोराना महामारी ने संपूर्ण देश लॉकडाऊन झाला असतांना अशा बिकट परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्वांकरिता सुरक्षा व सेवा देण्याचे काम पोलीस कर्मचारी सोबतच नगर परिषद आणि उपजिल्हा रुग्णालयाचे सफाई कामगार करीत असून या सर्वांच्या कामाला सलाम करण्याकरिता दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला,

उपजिल्हा रुग्णालय येथे मागील 4 महिन्यापासून कामाच्या निविदे संदर्भात तांत्रिक अडचनीमुळे ठेकेदारांना कामाचे आदेश न मिळाल्याने वेतन न मिळता सुद्धा मोफत सेवा देण्याचे काम 9 सफाई कामगार करीत आहे, शहरात पंपाद्वारे फवारणी व नाली सफाई व रस्ता सफाईचे काम निष्ठेने नगरपरिषद सफाई कामगार करीत आहे, सोबतच डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील जवळ नाकाबंदी करून संरक्षण देण्याचे काम पोलिस कर्मचारी करीत आहे, या सर्वांचा नगरपरिषद, उपजिल्हा रुग्णालय पोलीस स्टेशन मधे जाऊन त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या कार्याला सलाम करत त्यांना कामगार दिनानिमित्त शेख जैरूद्दिन छोटूभाई सार्वजनिक बांधकाम सभापती वरोरा तथा जिल्हा अध्यक्ष काँग्रेस असंघटित कामगार व त्यांचे सहकारी यांनी शुभेछा दिल्या, हा कार्यक्रम लॉक डाऊन नियमाचे सर्वानी पालन करत साजरा केला, यावेळी नितीन भांडेकर संतोष मेश्राम राहुल भोयर प्रेम केशवानी आदींची उपस्थिती होती .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here