Home भद्रावती दखलपात्र :- अखेर रेती माफिया वासुदेव ठाकरे यांच्या रेती साठ्यावर उपविभागीय अधिकारी...

दखलपात्र :- अखेर रेती माफिया वासुदेव ठाकरे यांच्या रेती साठ्यावर उपविभागीय अधिकारी यांची जब्ती ?

भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलच्या बातमीची दखल! इतरत्र ठेवलेला रेती साठा सुद्धा होणार जब्त, हायवा ट्रक व इतर मशीन सुद्धा जब्त होण्याची शक्यता.

रेती चोरी भाग – २

तालुक्यातील सर्व रेती घाटावर आपला जणू मालकी हक्क असल्याची दबंगिरी करणारे रेती माफिया वासुदेव ठाकरे यांनी तहसीलदार महेश शितोळे यांच्या सोबत भागीदारी करीत त्यांच्या माध्यमातून आपल्या प्रतिस्पर्धी ट्रक्टर मालकांचे ट्रक्टर पकडून त्यांना देशोधडीला लावण्याचे कटकारस्थान रचले व रेती चोरीत एकाधिकारशाही चालविलेली असल्याने त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे काही लोकांनी तक्रार दिली असल्याची माहीती आहे. विशेष म्हणजे ज्या तहसीलदार शितोळे यांच्याकडे राष्ट्रीय संपत्तीचे सरक्षण करण्याची जबाबदारी आहे तेच तहसीलदार आपल्या कर्त्यव्याला मूठमाती देत रेती माफिया सोबत मिळून रेती चोरीत कोट्यावधी रुपयाचा शासनाचा महसूल रेती माफियाच्या घशात घालत आहे, त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणे आवश्यक आहे, महत्वाची बाब म्हणजे नायब तहसीलदार काळे सुद्धा या रेती प्रकरणात सहभागी असल्याचे व्रूत्त आहे. आणि म्हणूनच उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल च्या बातमीची दखल घेवून काल सकाळी रेती माफिया वासुदेव ठाकरे याच्या काही रेती साठ्यावर धाड टाकून तो सील केला आहे. मात्र अजूनही अनेक ठिकाणी रेती साठा पडलेला असून त्या रेती साठय़ावर सुद्धा जब्तीची कारवाई करणार असल्याची माहीती उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी दिली आहे.

वासुदेव ठाकरे हे केवळ रेतीच चोरी करीत नसून ते कर्नाटका एम्टा च्या कोळसा चोरीत सुद्धा सहभागी होते अशी माहीती असून त्यांनी आपल्या वीट भट्टी परिसरात वीज चोरी सुद्धा चालविलेली आहे. आणि त्याहून मोठी बातमी म्हणजे यांच्या गाडीने नोव्हेंबर २०१९ मधे चारगाव परिसरातील पुलाखाली झालेल्या वाघाच्या म्रूतू झाल्याचे बोलल्या जात असल्याने त्यामधे त्याचा सहभाग आहे असे दिसत आहे त्यामुळे ते प्रकरण सुद्धा समोर येणार असल्याची माहीती आहे . एकूणच वासुदेव ठाकरे यांनी अवैध व्यवसायातून कमावलेली कोट्यावधी ची माया आता इन्कमटॅक्स विभागाच्या रडारवर असून त्याबाबत आता प्रशासन काय भूमिका घेणार ? यावर सर्व काही अवलंबून आहे. मात्र या प्रकरणात तहसीलदार शितोळे हे सुद्धा तेवढेच दोषी असून त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणे अपेक्षित आहे.

Previous articleखळबळजनक :-गडचांदूर पोलिसांच्या भ्रष्ट नियतीमुळे “तेलंगानातील” दारूची संचारबंदीतही गडचांदूरात विक्री
Next articleधक्कादायक :- रेती माफिया कडून गावकऱ्यांना जीवे मरण्याच्या धमक्या ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here