Home कोरपणा खळबळजनक :- रेतीमाफियांनी केला प्रफुल्ल चांदेकर यां पत्रकारांवर हल्ला, डोक्यावर गंभीर जखम...

खळबळजनक :- रेतीमाफियांनी केला प्रफुल्ल चांदेकर यां पत्रकारांवर हल्ला, डोक्यावर गंभीर जखम !

त्या हल्लेखोर रेती माफिया विरोधात कोरपणा पोलिस स्टेशन मधे तक्रार !

कोरपणा प्रतिनिधी :-

लॉक डाऊन च्या काळात रेती चोरी सारख्या घटना अतिशय गंभीर असतांना सुद्धा तहसीलदार यांचे या रेती चोरी प्रकऱणा कडे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याने राष्ट्रीय संपत्तीची खुलेआम चोरी होत आहे. मात्र या संदर्भात पत्रकारांनी राष्ट्रीय संपत्तीची चोरी प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यास पुरावे जमा करण्याचा प्रयत्न केल्यास रेती माफिया हे पत्रकारांवर हल्ला करतात व जीवे मारण्याच्या धमक्या देतात ही सुद्धा भयंकर घटना असून कोरपणा तालुक्यातील पिपरी गावातून नाला रेती चोरीला उधाण आले असले तरी महसूल  प्रशासन मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे, पियुष बंडू तिखट या रेतीमाफियांने पत्रकार (न्युज प्रभात पोर्टल)अनिल उर्फ प्रफुल्ल  चांदेकर यांना दगडाने मारून डोकं फोडले व त्यांना जीवे मारण्यांनी धमकी दिले , विशेष म्हणजे पीयूष तिखट हा पोलीस पाटील यांचा मुलगा असून प्रशासनातील व्यक्तीच्या मुलांनी अशाप्रकारे  माफियागिरी करणे म्हणजे ही भयंकर परिस्थिती सध्या कोरपना तालुक्यातील पिपरी गावात दिसून पडत आहे
चांदेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे.कोरपना तालुक्यातील पिपरी गावाला लागून असलेल्या नाल्यातून भर दिवसा रेती चोरी होत असून याकडे ग्राम पंचायत चे दुर्लक्ष होत होते , सरपंच यांना ट्रॅक्टर पकडण्यासाठी ग्राम दक्षता समितीचे अध्यक्ष पद दिले आहे परंतु त्यांनी आज पर्यंत एकही ट्रॅक्टर पकडले नाही त्यामुळे नागरिकांत शंका कुशंका निर्माण झाल्या आहे सदर रेती चोरी करणारे ट्रॅक्टर हे पिपरी येतील असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे मात्र तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी कार्यवाही न करता रेती तस्करी करणाऱ्यांना साथ देत असल्यानेच पत्रकार यांच्यावर हमला झाला असल्याची चर्चा आहे त्यामुळेच आता रेती माफिया सोबतच तहसीलदार यांच्यावर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.

Previous articleकाँग्रेस असंघटित कामगार संघातर्फे वरोरा पोलिस स्टेशन चे परीवेक्षाधिन कर्तव्यदक्ष आय.पी.एस यतीश देशमुख यांचा सत्कार !
Next articleआनंदाची बातमी:- जिल्ह्यातील एकमेव पॉझिटिव रुग्णाची प्रकृती स्थिर !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here