Home वरोरा काँग्रेस असंघटित कामगार संघातर्फे वरोरा पोलिस स्टेशन चे परीवेक्षाधिन कर्तव्यदक्ष आय.पी.एस यतीश...

काँग्रेस असंघटित कामगार संघातर्फे वरोरा पोलिस स्टेशन चे परीवेक्षाधिन कर्तव्यदक्ष आय.पी.एस यतीश देशमुख यांचा सत्कार !

शाल व पुष्पगुच्छ देऊन छोटू भाई शेख यांनी केला सत्कार !

वरोरा प्रतिनिधी :-

काँग्रेस कामगार विभाग जिल्हाध्यक्ष तथा वरोरा नगरपरिषद सभापती बांधकाम यांनी पुढाकार घेवून आयपीएस अधिकारी यतीश देशमुख यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी नगरपरिषद उपाध्यक्ष अनिल भाऊ झोटिंग गोपालन. गुडदे..सर उपस्थित होते. आयपीएस अधिकारी यतीश देशमुख यांनी तीन महिन्यापासून वरोरा पोलीस स्टेशन येथे अतिशय सजग आणि कर्त्यव्य निष्ठेने कार्य करून येथील गोरगरीब पीडितांना न्याय देण्याचे कार्य केले असून चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा हे पहिले पोलिस स्टेशन आहे जिथे कोरोना च्या या लॉक डाऊन च्या काळात शहरातील व तालुक्यातील गोरगरीब यांना अनाज व अन्न वाटप उपक्रम सतत सुरू आहे. त्याचे श्रेय हे आय पी एस अधिकारी देशमुख यांना जात असून त्यांचा पुढाकाराने शासकीय कर्मचारी शिक्षक व व्यापारी यांनी पोलिस स्टेशन मधे स्वयंस्फूर्तीने अनाज, धान्याच्या किट व इतर साहित्य जमा केले व दान देवून गोरगरीब जनतेच्या दैनंदिन गरजा पूर्ण केल्या एवढेच नव्हे तर भोजन व्यवस्था सुद्धा पोलिस स्टेशन येथे सुरू करून तालुक्यातील अतिशय गरीब कुटुंबांना भोजन व्यवस्था केली परंतु आता त्यांचा ट्रेनिंग पिरियड संपला असल्याने ते वरोरा पोलिस स्टेशन च्या पदभारा तून मुक्त होऊन समोर उपविभागीय पोलिस अधिकारी किंव्हा अतिरिक्त पोलिस अधीक्षक ह्या पोस्टिंग वर रुजू होणार आहे. त्यामुळेच त्यांच्या तीन महिन्याच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव स्थानिक स्थरावर व्हावा व त्यांना पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळावी ह्या हेतूने छोटू भाई शेख यांनी पुढाकार घेऊन कर्तव्यनिष्ठ अधिकारी देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.

Previous articleआनंदाची बातमी :-चंद्रपुरातील पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील 57 स्वॅब नमुन्यापैकी सर्व 57 नमुने निगेटिव्ह!
Next articleखळबळजनक :- रेतीमाफियांनी केला प्रफुल्ल चांदेकर यां पत्रकारांवर हल्ला, डोक्यावर गंभीर जखम !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here