Home चंद्रपूर खळबळजनक :- चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल १२ कोरोना रुग्ण आढळल्याने उडाली खळबळ !

खळबळजनक :- चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल १२ कोरोना रुग्ण आढळल्याने उडाली खळबळ !

चंद्रपूरमधे 21 मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ( आताचे 9+ यापूर्वीचे 3) 12 झाली.

चंद्रपूर कोरोना अपडेट :-

एकीकडे चंद्रपूर जिल्ह्यात एका क्रुष्ण नगर च्या पॉझिटिव्ह रुग्णांची रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने चंद्रपूर जिल्हा हा कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर असतांना
जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या वृत्तानुसार रात्री उशिरा नागपूर येथून प्राप्त अहवालामध्ये नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हे 9 रुग्ण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. यापैकी 5 जण वैद्यकीय महाविद्यालयात चंद्रपूर येथे उपचार घेत आहेत. तर 4 जण वन अकादमीच्या नव्या इमारतीत संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

१. वन अकादमीमध्ये 19 मे रोजी संस्थात्मक अलगीकरण करण्यात आलेले चार नागरिक नाशिक मालेगाव एमआयडीसीमध्ये काम करीत होते. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाने हे चार नागरिक पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे वन अकादमी मध्ये ठेवण्यात आले होते. हे चार नागरिक चिरोली ( मूल ), जाम (पोंभुर्णा ) विसापूर ( चंद्रपूर ) विरवा ( सिंदेवाही ) परिसरातील आहे.

२. पुणे येथून आलेले पती-पत्नी वरोरा येथे यापूर्वी संस्थात्मक अलगीकरणात होते. सध्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत.

३. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी परिसरातील एक वीस वर्षीय मुलगी सध्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहे.

४. चंद्रपूर जिल्ह्यातील आरवट येथील एकवीस वर्षाचा युवक ठाण्यावरून परत आला. वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहे.

५. ब्रह्मपुरी तालुक्यातील 21 वर्षीय युवक दिल्लीवरून परत आला सध्या वैद्यकीय महाविद्यालयात चंद्रपूर येथे उपचार घेत आहे.

हे सर्व रुग्ण संस्थात्मक अलगीकरणात ( इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ) आहेत.१९ मे रोजी यांचे स्वॅब घेण्यात आले होते. सर्व नागरिक बाहेरून आले असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

Previous articleसनसनिखेज :- दुर्गापूर मधील त्या तिसऱ्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णामुळे चंद्रपूर हादरले ?
Next articleआव्हान :-बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी स्वयंप्रेरणेने प्रशासनाला माहिती द्या, ना. विजय वडेट्टीवार यांचे आव्हान !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here