Home चंद्रपूर सनसनिखेज :- दुर्गापूर मधील त्या तिसऱ्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णामुळे चंद्रपूर हादरले ?

सनसनिखेज :- दुर्गापूर मधील त्या तिसऱ्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णामुळे चंद्रपूर हादरले ?

क्रुष्ण नगर मधील रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचा आनंद ठरला अल्पजीवी?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

एकीकडे चंद्रपूर शहरातील क्रुष्ण नगर मधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने चंद्रपूर जिल्हा कोरोनमुक्त होण्याच्या मार्गावर असतांना आता चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर, पंचशील नगर या परिसरातील एका 55 वर्षीय नागरिकाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याचे वृत्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी दिल्याने पुन्हा चंद्रपूर जिल्हा हादरला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या दुर्गापुर परिसरात हैद्राबाद येथून 13 मे रोजी एक युवती चंद्रपूर येथे परत आली. या युवतीला इंस्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ( संस्थात्मक अलगीकरण ) करण्यात आले होते. मात्र ही युवती कुटुंबाच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून 18 मे रोजी कुटुंबातील सहाही सदस्यांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. काल ६ पैकी ४ स्वॅब नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला होता, या चार अहवालात 55 वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहे. हैद्राबादवरून आलेली मुलगी, आई, व अडीच वर्षाच्या छोट्या मुलाचा अहवाल मात्र निगेटिव्ह असल्याची माहीती आहे.
या सहा पैकी आणखी दोन अहवाल प्रतीक्षेत आहे. 55 वर्षीय व्यक्तीमुळे आता चंद्रपूर येथे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा दोन झाली आहे.

Previous articleआनंदाची बातमी ;- चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोनच्या मार्गावर ?कृष्णनगर मधील पहिल्या पॉझिटिव रुग्णाचा १४ दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह!
Next articleखळबळजनक :- चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल १२ कोरोना रुग्ण आढळल्याने उडाली खळबळ !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here