Home वरोरा माणुसकी जपतोय कोण ? हे कळालं एका जर्जर झालेल्या महिलांची व्यथा...

माणुसकी जपतोय कोण ? हे कळालं एका जर्जर झालेल्या महिलांची व्यथा बघून !

छोटूभाई शेख यांच्यासह त्यांच्या मित्र परिवारातील सदस्यांनी दिला एका वेदनेने विव्हळणाऱ्या महिलेला आधार आणि रुग्णालयात भरती करून जपला माणुसकीचा मंत्र !

वरोरा प्रतिनिधी :-

शहरात दिनांक १२ मार्चला रात्री ७.३०.वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक गणेश विसर्जन घाटावर मागील ८ दिवसापासून . शोभा कळस्कर वय 55 वर्ष महिलेचा उजवा पाय पूर्णता सडला होता व ती त्याठिकाणी मागील आठ दिवसापासून बसून रडत ओरडत होती की मला दवाखान्यात न्या पण माणुसकी हरवलेली अनेक लॉक त्या रस्त्यावरून जायची पण त्या महिलेकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करायचे, वेदनेने तडफडत असतांना माणुसकीचा धर्मच जणू लोकं विसरले होते. अशातच सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतलेले छोटूभाई शेख यांना कुणीतरी सांगितले की तळ्याच्या किनाऱ्यावर एक बीमार महिला राहत आहे व ती ओरडत आहे. त्याचं क्षणी छोटूभाई यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह बाबा खंडाळकर, गोपाल गुडदे सर, राहुल भोयर, योगेश कोडापे, इक्बाल भाई, मनोज ठाकरे यांना घेऊन त्यांनी तो परिसर गाठला असता त्या महिलेची स्थिती बघून अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले.
त्याचं दरम्यान वरोरा येथे नव्यानेच आईपीएस अधिकारी ठाणेदार म्हणून आले त्या देशमुख साहेबांनी अम्बुलन्स पाठवली असताना छोटूभाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिला ॲम्बुलन्स गाडी मध्ये उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे भरती केले आणि मात्र तिचा पाय पूर्णता खराब झाला होता व त्यामधे अळ्या पडल्या होत्या त्यामुळे कारपेंटची आवश्यकता ते उपजिल्हा रुग्णालयात नसल्याने बाहेरून मेडिकल मधून व्यवस्था करून दिली आणि डॉक्टर नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी पायाचे ड्रेसिंग करून इंजेक्शन दिले, पण तिची ट्रीटमेंट वरोरा येथे होऊ शकत नसल्याने तिला छोटूभाई यांनी आपले दोन कार्यकर्ता सोबत देऊन जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भरती करण्याकरिता पाठवलेले आहे, या कामाकरिता आयपीएस देशमुख आणि छोटूभाई यांच्या कार्याची दखल अनेकांनी घेतली कारण संत गाडगेबाबा म्हणायचे की देव हा दगडात नाही तर तो रंजल्या गांजल्यामधे शोषित पीडितांमधे आहे आणि तोच वसा छोटूभाई यांनी पाळून त्या बीमारीने जर्जर झालेल्या पिडीत महिलेला आधार देवून तिला उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वखर्चाने पाठवले हाच माणुसकीचा खरा धर्म आहे.
यावेळी छोटूभाई यांनी आईपीएस अधिकारी देशमुख यांना विनंती करून शोभा कळस्कर यांचे भाऊ व नवऱ्याला उद्या पोलीस स्टेशन मध्ये बोलावुन तिच्या उपचार व पालन-पोषण करण्याकरिता सांगावे अशी विनंती केली असता देशमुख साहेबांनी ते मान्य केले असल्याने एक पिडीत महिलेला न्याय मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here