Home चंद्रपूर अखेर घूग्गूस सायडिंगवरील कोळसा चोरी प्रकरणात भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलच्या बातमीच्या पाठपुराव्याला...

अखेर घूग्गूस सायडिंगवरील कोळसा चोरी प्रकरणात भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलच्या बातमीच्या पाठपुराव्याला यश,

घूग्गूस सायडिंग वरून कोळसा चोरी प्रकरणात वेकोलिच्या दोन सुरक्षा रक्षकांवर निलंबनाची कारवाई ? पण खरे सुत्रधार अजूनही पडद्यामागे ? लॉकडाऊन मधे कोट्यावधीच्या कोळशाची चोरी झाल्याची आशंका, चोरी करणारे अधिकारी, पकडले जाते कर्मचारी?  असा किस्सा होणार उघड ?

कोळसा चोरी भाग- ३

घूग्गूस प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यातील वेकोलि अधिकारी यांच्या सहमती शिवाय मोठ्या प्रमाणात कोळसा चोरी कधीच होऊ शकत नाही असे दस्तुरखुद्द वेकोलि कर्मचारी यांचे म्हणने आहे. आणि घूग्गूस वेकोलि सायडिंग वरून ज्या तीन ट्रक गाड्या खाली न होता त्या नागाडा कोळसा टालवर ऊतरविल्या गेल्या त्यामागे सुद्धा वरिष्ठ वेकोलि अधिकाऱ्यांचा आशीर्वाद होता पण या प्रकरणाची वाच्यता सार्वजनिक झाल्याने या कोळसा चोरीची तक्रार पोलिसात द्यावी लागली हे आता समोर येत आहे.

खरं तर अनधिकृतपणे चालणाऱ्या पडोली व नागाडा येथील कोळसा टालवर वेकोलि मधील चोरीचा कोळसा इथे खाली होतो हे आता शीद्ध झाले असून मग तो कोळसा वेकोलितून सरळ चोरून आणलेला कोळसा असो की सबसिडीच्या नावाखाली कोळसा चोरी केलेला कोळसा असो, तो सर्व कोळसा हा याच बेकायदेशीर चालणाऱ्या कोळसा टाल वर उतरतो. पण जेंव्हा जेंव्हा पोलिस कारवाई होते तेंव्हा कोळसा टाल मालक मात्र यातून अलगद बाहेर येतो व त्यांचेवर गुन्हे दाखल होतं नाही, ही परीस्थिती असतांना आता दिनांक ४ मार्चला पैनगंगा कोळसा खाणीतून निघालेले कोळसा ट्रक हे घूग्गूस कोळसा सायडिंग वर खाली न होता ते सरळ नागाडा येथील कोळसा टालवर खाली झाल्याने पैनगंगा कोळसा प्रकल्पाचे महाप्रबंधक अजय सिंह यांनी घूग्गूस पोलिस स्टेशन मधे तीन ट्रक चालक गौरीशंकर वाढई, तलाश तिरसोडे, व उमेश येडामे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

या तक्रारी संदर्भात भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टलने सर्वात आधी ही बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून प्रकाशित केली होती व या प्रकऱणात वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोट्यावधी रुपयाच्या कोळसा घोटाळ्याची चौकशी करून घूग्गूस येथील कोळसा सायडिंग चा (काटा अधिकारी) बाबू आणि सुरक्षा रक्षक यांचेवर कारवाई करावी अशी विविध स्तरातून मागणी होतं असल्याची बातमी प्रकाशित करण्यात आली होती. त्या बातमीची सत्यता आता समोर आली असून घूग्गूस येथील कोळसा सायडिंग वर कार्यरत दोन सुरक्षा रक्षक स्वामी कन्कुटला व सतीश वांद्रे यांना वेकोली प्रशासनाने निलंबित केले असल्याने आता तो सायडिंग वर ट्रक खाली झाल्याची पावती देणारा बाबू मोकाट कसा ? हा प्रश्न समोर येत आहे. कारन कोळसा सायडिंगवर खाली झाला नसतांना तो खाली झाल्याची पावती बाबू देतो म्हणजे ह्या कोळसा चोरीत बाबू तेवढाच दोषी आहे.
आता हे कोळसा चोरी प्रकरण घूग्गूस पोलिस स्टेशन मधून गडचांदूर पोलिस स्टेशन मधे स्थलांतरित करण्यात आल्याचे बोलल्या जात आहे, त्यामुळे आता ज्या नागाडा कोळसा टाल मालक, सब एरिया मैनेजर, सायडिंग वाला बाबू आणि स्वतः मुख्य महाप्रबंधक यांची पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास कोट्यावधीचा कोळसा घोटाळा बाहेर येवू शकतो. कारण विशेष सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका महिन्या अगोदर अशाच कोळसा ट्रक गाड्या वणीच्या कोळसा टालवर ऊतरविल्या गेल्याचे बोलल्या जात असून त्या प्रकरणात कुणावरही गुन्हे दाखल न करता ते प्रकरण दडपल्या गेल्याची सुद्धा माहिती आहे.

Previous articleन्यू आदर्श संस्था व गुरुदेव सेवा मंडळातर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण ! 
Next articleधक्कादायक :- कोरोना संदर्भातील प्रसारमाध्यमांनीच गमावली विश्वसनीयता ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here