Home वरोरा न्यू आदर्श संस्था व गुरुदेव सेवा मंडळातर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण ! 

न्यू आदर्श संस्था व गुरुदेव सेवा मंडळातर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण ! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उखर्डा गावात आगळावेगळा उपक्रम ! 

उखर्डा प्रतिनिधी :-

कोरोना ह्या जीवघेण्या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामूळे अनेक गरीब मजूर व कामगारांवर उदरनिर्वाहाचे मोठे संकट ओढावले आहे. आपण आपल्या घरात राहून सुरक्षित असलो तरी ह्या सर्वांत मजूर व कामगार हतबल झालेले दिसत आहेत. सर्व कामधंदा, मजुरी, रोजगार बंद असल्याने त्यांना पोटाची खळगी कशी भरावी? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
ह्या अडचणीच्या काळात सर्वांना सहकार्य व्हावे, तसेच आपला एकही बांधव उपाशी राहू नये यासाठी *न्यू आदर्श बहुउद्देशीय संस्था, श्री गुरुदेव मंडळ* व *उखर्डा गावातील सर्व ग्रामवासी*, उपसरपंच विलास भाऊ कुडे , भास्कर राव कुडे, रोशन भोयर, विनोद कोठारे, रणजित कुडे, विजय पुसदेकर, तेजस उरकुडे, अभिजित कुडे, योगेश पुसदेकर, रणजित हिवरकर, आशिफ शेख, संकेत ऊरकुडे, ऋषिकेश कुडे, बबलू धोटे, शुभम हिवरकर, समीर नखाते,अक्षय हिवरकर, चेतन पुसदेकर,प्रवीण ऊसरे, अमोल घोटेकर यांच्या पुढाकाराने ह्या गरजु मजूर व कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्याचे ठरले आणि आज बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त गोर गरीब, मोल मजूर, यांना गहू, तांदूळ, दाल, तेल, तिखट, मीठ, हळद, अशी संपूर्ण जीवनावश्यक सामग्री किट तयार करण्यात आली. सर्व गरजुंना ह्या जीवनावश्यक किटचे वितरण करण्यात आले. जेणेकरून त्यांचा हा अडचणीच्या काळात त्यांना धैर्याने सामोरे जाण्याचे बळ मिळावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here