Home चंद्रपूर ब्रेकिंग न्यूज :-बेकायदेशीर कोळसा टाल चालक अख्तर सिद्दिकीसह पत्रकार व वेकोली अधिकाऱ्यांवर...

ब्रेकिंग न्यूज :-बेकायदेशीर कोळसा टाल चालक अख्तर सिद्दिकीसह पत्रकार व वेकोली अधिकाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल ?

पैनगंगा कोळसा खाणीतून निघालेले कोळसा ट्रक घूग्गूस वेकोली सायडिंग वर खाली न होता अख्तर सिद्दिकीच्या टालवर कसे ? मुख्य महाप्रबंधक कावळे गोत्यात ?

कोळसा चोरी भाग – ४

पैनगंगा कोळसा खाणीतून कोळसा चोरीच्या प्रकरणात अनेक कोळसा माफिया सक्रिय असून या वेकोली खाणीतून कोळसा कसा चोरायचा ? यांचे कित्तेक प्लान कोळसा माफिया करीत असतात, मागील काही महिन्यापूर्वी याच कोळसा खाणीतुन कोळसा चोरीसाठी गैंगवार होऊन अनेकावर गुन्हे दाखल झाले होते. पण तरीही कोळसा चोरी चे प्रकरण थांबता थांबत नाही, आत्ता तर लॉक डाऊन च्या संधीचा फायदा घेवून पैनगंगा कोळसा खाणीतून घूग्गूस वेकोली कोळसा सायडिंगवर कोळशाच्या ट्रक गाड्या खाली न होता त्या तीन गाड्या सरळ नागाडा येथील बेकायदेशीर कोळसा टाल चालविणाऱ्या अख्तर सिद्दिकी यांच्या टालवर खाली झाल्या होत्या, त्यामुळे पैनगंगा वेकोली महाप्रबंधक अजय सिंह यांनी रीतसर घूग्गूस पोलिस स्टेशन मधे तक्रार देवून कोळसा चोरीच्या या प्रकरणात गुंतलेल्या सर्व आरोपीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. त्यात तीन ट्रक चालक यांच्यावर गुन्हे दाखल झाले खरे पण मुख्य मास्टरमाईंड कोळसा माफिया,बेकायदेशीर कोळसा टाल चालविणाऱ्या अख्तर सिद्दिकी , दोन पत्रकार व वेकोली वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल होणे अपेक्षित होते, मात्र आता या सर्वावर लवकरच गुन्हे दाखल होऊन लॉक डाऊनच्या काळात जवळपास एक महिन्यात कोट्यावधी रुपयाच्या कोळसा चोरीचा मामला समोर येवू शकतो, त्यामुळे बेकायदेशीर कोळसा टाल चलवीणारे सिद्दिकी यांच्या टाल वर असलेला सर्व कोळसा जब्त करण्यात यावा व दोन पत्रकार आणि वेकोली अधिकारी यांना पोलीसानी ताब्यात घेवून त्यांच्या चल अचल संपती ची चौकशी करावी अशी मागणी होत आहे. आता या प्रकरणात चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडवून देणारे काही तथ्य जनतेसमोर लवकरच येणार असल्याची चर्चा आहे …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here