Home चंद्रपूर धक्कादायक :- वेकोली कोळसा चोरी प्रकरणी गडचांदूर पोलिसांची ही कसली कारवाई ?...

धक्कादायक :- वेकोली कोळसा चोरी प्रकरणी गडचांदूर पोलिसांची ही कसली कारवाई ? चोरीचा कोळसा पुन्हा पैनगंगा कोळसा खाणीत कसा ?

तीन आरोपी सह चौथा आरोपी भीमा अटकेत, मात्र कोळसा चोरीचे मास्टर माईंड, कोळसा माफिया व बेकायदेशीर कोळसा टाल चालक अख्तर सिद्दिकीला पोलिसांचे सरक्षण ? गुन्हा दाखल करणार की सोडणार ? पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह ?

कोळसा चोरी भाग – ५

पडोली आणि नागाडा येथील बेकायदेशीर कोळसा टाल हे कोळसा माफीयायांचे कोळसा चोरीचे अड्डे बनले असून पैनगंगा कोळसा खाणीतून आलेला कोळसा हा घूग्गूस सायडिंगवर न उतरता तो कोळसा माफियांच्या बेकायदेशीर कोळसा टालवर उतरतो व नंतर त्या कोळशाचे ग्रेड्डिण्ग केल्या जाते व तो कोळसा खुल्या बाजारात चढ्या भावाने विकल्या जात असतो. या कोळसा चोरीच्या धंद्यात वेकोलीला कोट्यावधी रुपयाचा दरमहा चुना लावल्या जात असून हा कोळसा चोर बाजारात विकल्या जात असल्याने वेकोलीच्या सुरक्षा रक्षक पासून तर सायडिंग बाबू आणि अधिकारी यांच्यासह पोलिस विभाग पण सामील असल्यामुळेच कोळसा चोरी होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

नुकताच तीन गाड्यांच्या चालकांना पैनगंगा कोळसा खाणीतून घूग्गूस वेकोली कोळसा सायडिंगवर कोळशाच्या ट्रक गाड्या खाली न करता त्या तीन गाड्या सरळ नागाडा येथील बेकायदेशीर कोळसा टाल चालविणाऱ्या अख्तर सिद्दिकी यांच्या टालवर खाली झाल्या प्रकरणी तीन ट्रक चालकावर गुन्हे दाखल झाले असून चौथा ट्रक चालक आरोपी भीमा सुद्धा पोलिस अटकेत आहे, घूग्गूस पोलिस स्टेशन मधून हे प्रकरण दिनांक ११ एप्रिलला गडचांदूर पोलिसांकडे वर्ग केल्यानंतर प्रथमच तीनही ट्रक चालकांची पोलिस कस्टडी घेण्यात आली होती,

मात्र ८ दिवस उलटून सुद्धा या प्रकरणाचे मास्टर माईंड आणि विशेष करून नागाडा येथील बेकायदा कोळसा टाल चालविनारे अख्तर सिद्दिकी, कोळसा माफिया या शिवाय दोन पत्रकार सामील असल्याची बाब उघड झाल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास चालविणे आवश्यक असतांना मिळालेल्या सूत्रांकडील माहितीनुसार पोलिस प्रशासनाने मात्र दिनांक १९ एप्रिलला त्याच आरोपी ट्रक चालकाना बेकायदेशीर चालणाऱ्या कोळसा टालवर घेवून जातात व तिथे तीन ट्रक मधे कोळसा भरल्या जातो आणि पैनगंगा कोळसा डेपो मधे रात्री ९ वाजता तो कोळसा पोलिसांच्या समक्ष खाली करण्यात येतो, हे न समजणारे कोडे असून बेकायदेशीर कोळसा टाल चालवणाऱ्या अख्तर सिद्दिकिला व कोळसा माफिया यांना वाचविन्याचा हा प्रकार तर नव्हे ना ? अशी शंका येत आहे.

या कोळसा चोरी प्रकरणात दोन सुरक्षा रक्षकाना अगोदरच वेकोली प्रशासनाने निलंबित केले त्यामुळे वेकोली प्रशासनाची भूमिका ही ताठर असली तरी पोलिसांच्या चौकशीत नेमकी काय माहीती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आता पैनगंगा वेकोली महाप्रबंधक अजय सिंह यांनी रीतसर घूग्गूस पोलिस स्टेशन मधे तक्रार देवून कोळसा चोरीच्या या प्रकरणात गुंतलेल्या सर्व आरोपीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.आणि त्यात तीन ट्रक चालक यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते पण चोरीचा कोळसा पैनगंगा कोळसा खाणीत रात्री परत कसा पाठविला जातो ? काय फिर्यादी अजय सिंह यांनी तशी मागणी केली होती का ? हे पाहणे महत्वाचे असून ही पोलिसांची चूक ठरू शकते, कारण ज्याअर्थी ट्रक चालक यांना अटक झाली आणि ट्रक जब्त झाले तर न्यायालयात पोलिस प्रशासनाद्वारे चोरीचा कोळसा परत केला असे सांगण्यात येणार का ? हे समजायला मार्ग नसून पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here