Home Breaking News त्या कथित” सुपारी ‘ विक्री प्रकरणात नेमके तथ्य काय? पोलिस वर्तुळासह शहरात...

त्या कथित” सुपारी ‘ विक्री प्रकरणात नेमके तथ्य काय? पोलिस वर्तुळासह शहरात खमंग चर्चा

गोंडपिंपरी पोलिस स्टेशन ठाणेदार यांच्या कर्त्यव्यावर प्रश्नचिन्ह ?

गोंडपिपरी :- तालुका प्रतिनिधी

संपूर्ण जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाव्हायरस मुळे इतिहासात प्रथमताच लॉक डाऊन करणे भाग पडले. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंसह अन्य वस्तूंचे भाव गगनाला भिडल्या चे दिसून येते. अशातच खर्रा शौकिनांची वाढती मागणी पाहून सुगंधित तंबाखू व अन्य वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यवसायिकांनी पान मटेरियल साहित्याची दुपटी तिपटीने दरवाढ करून विक्री करण्याचा गोरख धंदा चालविला आहे. याचाच फायदा घेत गोंडपिपरी ठाण्यातील दोन युवा पोलीस शिपायांनी सुगंधित तंबाखू असल्याच्या संशयावरून एका इसमाचे वाहन अडवून कसून तपासणी केली. मात्र हाती केवळ सुपारी हे पान मटेरियल साहित्य मिळाल्याने मिळकत कमवू पाहणाऱ्या त्या दोन शिपायांनी चक्क सुपारीचे पोते ठाण्यात आणले. हस्तगत केलेल्या सुपारीचा परस्पर विक्रीचा अयशस्वी प्रयत्न त्या दोघांनी चालविला. मात्र बिंग फुटण्याच्या धास्तीने विक्री केलेली सुपारी परतं आणत प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केल्याची खमंग चर्चा पोलीस वर्तुळा सह शहरात सर्वत्र चर्चिल्या जात असून सदर कथित “सुपारी’ विक्री प्रकरणात नेमके तथ्य काय ? असा यक्ष सवाल सर्वान समक्ष उभा ठाकला असून सदर घटना गेल्या शुक्रवारच्या सायंकाळी विठ्ठल वाडा परिसरात घडली असल्याचे सुत्रांकडून कळते.
जिल्हा सीमेवर वसलेला गोंडपिपरी तालुका हा आदिवासीबहुल अतिदुर्गम व नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून च्या काळात गोंडपिपरी पोलीस ठाण्यातील काही युवा पोलीस शिपायांनी चक्क ठाणेदारांना गळ घालून वसुलीचा गोरख धंदा चालविला चे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहे. आता मात्र त्या वसुली मास्टर युवा पोलीस शिपायांनी ठाणेदाराच्या अती निकटवर्तीय असल्याचा गैरफायदा घेत केवळ मिळकत कमविण्यासाठी पोलीस विभागाच्या सर्व सीमा ओलांडून सर्वसामान्य जनतेसही वेठीस धरण्याचा प्रकार शुक्रवारी घडलेल्या कथित चर्चेतून दिसून येते.
तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्री, सुगंधी तंबाखू व अन्य तंबाखूजन्य पदार्थ विक्री, गोवंश तस्करी तसेच अनेक अवैध धंदे अगदी राजरोसपणे सुरू आहे.
लॉक डाऊन पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंसह सुगंधित तंबाखू ,सुपारी आदींचे दुपटी तिपटीने दरवाढ करून विक्री सुरू आहे. अशातच तालुक्यातील विठ्ठलवांडा परिसरातील एक इसम पान मटेरियल साहित्य नेत असल्याची भनक पोलिसांना लागतात त्यांनी त्या इसमाला गाठून त्याची कसून तपासणी केली असता कुठलेही तंबाखूजन्य पदार्थ न मिळाल्याने त्या इसमास कारवाईची भीती दाखवून त्याचे जवळ असलेली 40 ते 50 किलो सुपारी अंदाजे किंमत 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला.आणि सुपारी नेणाऱ्या त्या इसमास धाकधपट करून हाकलून लावले.
केलेली मेहनत निष्फळ ठरत असल्याचे पाहून त्या दोन शिपायांनी हस्तगत केलेली सुपारी चा विक्रीतून परस्पर विल्हेवाट लावण्याचा बेत आखत चक्क शासकीय वाहनातून नेऊन गरजू व्यवसायीका पर्यंत ती सुपारी  पोहोचविली.
मात्र घडलेल्या घटनेची कुणकुण ठाणेदारसह अन्य कर्मचाऱ्यांना लागल्याचे पाहून आपले बिंग फुटणार या धास्तीने त्या दोन सेटिंग मास्टर शिपायांनी लगेच विक्री करण्यात आलेली सुपारी परतही आणली. घडलेला सर्व प्रकार इतर कार्यरत पोलिसांच्या लक्षात आल्याने कुजबुज सुरू झाली. तर या सर्व कथित प्रकरणाची खमंग चर्चा आता शहरात सर्वत्र रंगू लागली आहे. तत्पूर्वी येथे कार्यरत त्या युवा पोलीस शिपायांनी अवैद्य दारू तस्करी, अवैद्य चोर बीटी बियाणे विक्री, सुगंधी तंबाखू विक्री आधी प्रकरणातील कारवायांमध्ये तस्कर यांसोबत आर्थिक तडजोड करून जप्त केलेल्या मालाला परत देण्याचा पराक्रम ही केल्याचे माहिती सुत्रांकडून कळते. “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” या बीद्राचा विसर पाडत ठाणेदाराने दिलेल्या अधिकाराचा संपूर्ण ठाणे हद्दीत पूर्णतः लाभ उठवत या युवा सेटिंग मास्टर पोलिसांनी सर्वसामान्य जनतेसही वेठीस धरण्या चा गंभीर प्रकार तत्कालीन व विद्यमान ठाणेदाराच्या कारकीर्दीत अंगलट आणला असून यामागे ठाणेदाराची नेमकी भूमिका काय ? असे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. गोंडपिपरी पोलीस ठाण्यात अनेक अनुभवी पोलीस कर्मचारी तथा अधिकारी कार्यरत असतानाही ठाणे हद्दीत घडलेल्या जवळपास प्रत्येक घटनेमध्ये ठाणे दाराचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तरूण पोलिस शिपायांचा हस्तक्षेप असतोच हे नागरिकांना अनेकदा पहावयास मिळाले.
संपूर्ण देशात लॉकडावून परिस्थिती असतानाही शहरात मात्र मोहा फुल दारू, गुळ मिश्रित हातभट्टीची दारू ची सर्रास विक्री सुरू असून शहरात सुरू असलेल्या अस्थापना बँका सेवा केंद्र भाजीपाला मार्केट येथे ते सोशल डिस्टन्सिंग हरताळ फासल्या जात आहे. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची शाब्बासकी मिळविण्यासाठी केवळ कर्तव्यदक्ष तेचा टेंभा मिरवून सोशल मीडिया व प्रसार माध्यमातून खोटी प्रसिद्धी करून घेण्याचा प्रकार सध्या शहरात जोरदार चर्चेचा विषय बनला असून वरिष्ठ अधिकारी गांभीर्याने या प्रकाराकडे लक्ष देतील काय?असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here