Home चंद्रपूर खतरनाक :- कोळसा माफियानीच घेतली त्या चार कोळसा चोरीच्या ट्रक चालकांची जमानत...

खतरनाक :- कोळसा माफियानीच घेतली त्या चार कोळसा चोरीच्या ट्रक चालकांची जमानत ?

कोळसा चोरीचा खतरनाक खेळ करणारे खरे कोळसा माफिया अजूनही पोलिसांच्या अटकेपासून दूर, गडचांदूर पोलिस दोन वर्षापूर्वीच्या त्या कोळसा चोरी प्रकऱणासारखे हे प्रकरण पुन्हा दडपणार का  ? या कोळसा चोरी प्रकरणात वेकोली व्हिजिलेन्स कडून सुद्धा चौकशी व्हावी अशी होत आहे मागणी, वेकोली अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले ?

कोळसा चोरी भाग – ६

चंद्रपूर जिह्यात कोळसा माफियांच्या वेकोली अधिकारी आणि पोलिस प्रशासनासोबत असलेल्या आर्थिक वाटाघाटीमुळे वेकोलीचा दरमहा कोट्यावधीचा कोळसा चोर बाजारात जात असल्याची माहीती असून नुकताच काही महिन्यापूर्वी नागाडा येथील बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कोळसा माफिया कैलास अग्रवाल यांच्या कोळसा टालवर तब्बल २६ ट्रक  सबसिडीचा  कोळसा  चोरी झाल्याचे आढळल्याने  कैलास अग्रवाल आणि इतर दोन व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते प्रकरण ताजे असतांनाच आता त्याहीपेक्षा खतरनाक  कोळसा चोरीचे प्रकरण पैनगंगा कोळसा खान प्रकल्प महाप्रबंधक अजय सिंह यांनी तक्रार देवून उघडकीस आणले असून भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर या कोळसा चोरीचे वार्तान्कन सुरुवातीपासून सुरू आहे.

या प्रकरणात घूग्गूस येथील कोळसा माफिया यांचा मोठा सहभाग असून वणी येथील ट्रांसपोर्टर यांना पैनगंगा कोळसा खान ते घूग्गूस कोळसा सायडिंग वर कोळसा वाहतूक करण्याचे कंत्राट आहे, मात्र त्यांना अंधारात ठेवून व त्यांच्या ट्रक गाड्यांच्या ड्रायवरला आमिष देवून कोळसा माफिया हे स्वतःचे ड्रायवर पुढे करतात व त्या चोरीच्या ट्रक गाड्याना नागाडा कोळसा टालवर खाली करायला लावतात, हा प्रकार लॉक डाऊनच्या काळात तब्बल एक महिनाभर झाला असल्याने आतपर्यंत अशा किती गाड्या ह्या नागाडा कोळसा टालवर खाली झाल्या असेल ? याची चौकशी पोलिसांकडून होणे अपेक्षित आहे, मात्र मागील दोन वर्षापूर्वी ह्याच गडचांदूर पोलिसांनी पैनगंगा कोळसा खाणीतून कोळसा चोरीची गाडी पकडल्या नंतर सुद्धा ते प्रकरण रफादफा केले होते त्यामुळे हे प्रकरण सुद्धा ते दडपणार का ? असा संशय येत आहे. कारण दिनांक १९ एप्रिलला ज्या नागाडा येथील अख्तर सिद्दिकी यांच्या बेकायदा कोळसा टालवरून चोरीचा कोळसा उचलून तो पैनगंगा कोळसा सायडिंग वर टाकल्याची माहीती व ते तीन ट्रक गडचांदूर पोलिस स्टेशन मधे जमा केल्याची माहीती स्वतः पोलिस देतात मात्र त्या कोळशामधे जवळपास ९ ते १२ टन कोळसा कमी भरल्याचे वेकोली अधिकारी यांच्या लक्षात येताच पोलिसांच्या इशाऱ्याने घूग्गूस येथील एका कोळसा माफियाद्वारे स्वतः नागाडा कोळसा टालवरून तितका कोळसा पैनगंगा कोळसा सायडिंग वर पोहचवूण भरपाई केली जाते. याचा अर्थ पोलिसांच्या तपासाची दिशा काय आहे ? हे कळत असून गडचांदूर पोलिसांकडून तपास काढून तो स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात आल्यास खरे गुन्हेगार समोर येवू शकते,

या प्रकरणात सापडलेले तीन ड्रायवर व कोळसा माफिया यांचा एक ड्रायवर अशा चार ट्रक चालकांना जामीन मिळाला असून त्यांना जामीन मिळविण्यासाठी स्वतः घूग्गूस येथील कोळसा माफिया न्यायालयात हजार होते अशी माहीती आहे. याचा अर्थ खरे कोळसा चोर अजूनही मोकाट असून या प्रकरणात दोन पत्रकारांनी दोन्ही तबल्यावर हात ठेवून आपलं चांगभलं केलं असल्याने त्यांचं नाव सुद्धा या गुन्ह्यात सामील होऊ शकते अशी शक्यता आहे, पण जिथे चौकशी ही योग्य दिशेने आणि निस्वार्थ भावनेने झाली तरच खरे चोर समोर येवून वेकोली च्या दरमहा कोट्यावधीच्या संपतीची चोरी थांबू शकते, मात्र आता गडचांदूर पोलिस खरोखरंच योग्य दिशेने तपास करून खऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळणार की पुन्हा दोन वर्षापूर्वी ची पुनरावृत्ती करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Previous articleत्या कथित” सुपारी ‘ विक्री प्रकरणात नेमके तथ्य काय? पोलिस वर्तुळासह शहरात खमंग चर्चा
Next articleधक्कादायक ;- पैनगंगा कोळसा चोरी प्रकरणात टाल मालक सिद्दिकी, वेकोली अधिकारी आणि कोळसा माफिया यांच्यात खलबत्ते?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here