Home चंद्रपूर धक्कादायक ;- पैनगंगा कोळसा चोरी प्रकरणात टाल मालक सिद्दिकी, वेकोली अधिकारी आणि...

धक्कादायक ;- पैनगंगा कोळसा चोरी प्रकरणात टाल मालक सिद्दिकी, वेकोली अधिकारी आणि कोळसा माफिया यांच्यात खलबत्ते?

कोळसा चोरीचे प्रकरण बाहेर काढणाऱ्या अजय सिंह यांच्यावर दबाव ? घूग्गूस सायडिंगच्या काटा बाबूवर काय कारवाई ? पोलिसांना चिरिमिरी देवून प्रकऱणा रफादफा करण्याचे संकेत ?

कोळसा चोरी भाग – ७

चंद्रपूर प्रतिनिधी :-

पैनगंगा कोळसा खाणीतून कोळसा चोरी करणारे कोळसा माफिया यांनी आपले शातीर पैतरे खेळणे सुरू केले असून वेकोली अधिकारी यांच्या सोबत हात मिळवून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग असा आहे की ज्या अख्तर सिद्दिकी यांच्या बेकायदेशीर चालणाऱ्या नागाडा येथील कोळसा टालवर चोरीचा तीन ट्रक कोळसा खाली झाला आणि नंतर पोलिस प्रशासनाने तो खाली झालेला कोळसा परत त्याच पकडलेल्या गाड्यांमधे भरून तो पैनगंगा कोळसा सायडिंगवर खाली केला मात्र त्यात कोळसा कमी भरला असता नंतर घूग्गूस येथील कोळसा माफिया यांनी स्वतः १२ चाकी टिप्पर क्रमांक ०५०८ ने पैनगंगा कोळसा सायडिंग वर उर्वरित कोळसा पोहचता केला आहे , याचा अर्थ ज्या तीन ट्रक चालकांवर गुन्हे दाखल झाले तेव्हा वेकोली अधिकारी अजय सिंह यांना सुद्धा कोळशाच्या गाड्या नागाडा येथील अख्तर सिद्दिकी यांच्या कोळसा टालवर खाली झाल्याची माहीती होती तर त्यानी तक्रारीत त्या अख्तर सिद्दिकी यांचे नाव नमूद का केले नाही ? हा प्रश्न अतिशय गंभीर असून दिनांक ४ मार्च ला तीन ट्रक कोळसा चोरीची घटना असतांना दिनांक ९ एप्रिलला तक्रार का करण्यात आली ? त्यामागे कोण असे लोक आहे की ज्यांच्यामुळे अजय सिंह यांना नाईलाजाने पोलिसात तक्रार द्यावी लागली ? यामधे ते दोन संदिग्ध पत्रकार तर नाही ना ? असे प्रश्न उभे राहत आहे, विशेष बाब म्हणजे घूग्गूस काटा सायडिंग वर वेकोली चा एक कर्मचारी व गोलच्छा चे खाजगी कंप्यूटर ऑपरेटर असल्याने त्यांच्या माध्यमातून कोळसा खाली केल्याची रिटर्न पावती मिळते आणि तो ट्रकमधील कोळसा खाली न होता ते ट्रक बेकायदेशीर कोळसा टाल वर खाली केले जाते.
या प्रकरणात आता तर कोळसा माफिया कडून चक्क एक ट्रक ड्रायवर खासकरून स्वतःवर पोलिस केस घेण्यासाठी समोर आल्याने नव्हे त्या तीन ट्रक चालकांनी त्याचे नाव घेतल्याने त्या सर्वांची जमानत कोरपणा न्यायालयातून घूग्गूस येथील एक कोळसा माफियाने घेतली होती. त्यामुळे हे प्रकरण वेगळ्या वळणावर आले असून वेकोली अधिकारी यांच्यासोबत कोळसा माफियांची सेट्टिंग झाली की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

या प्रकरणात गडचांदूर पोलिस यांच्याकडे तपास असल्याने त्यांचा पूर्व इतिहास बघता या प्रकरणाच्या मुळाशी ते नक्की जातील पण निष्पन्न मात्र काही निघणार नाही असे चिन्ह दिसत असल्याने या तपासाची सूत्रे स्थानिक गुन्हे शाखे ( एलसीबी) कडे दिल्यास वेकोली च्या कोट्यावधी रुपयाच्या कोळसा चोरीच्या या प्रकरणात कोळसा माफिया, वेकोली अधिकारी आणि बेकायदेशीर कोळसा टाल संचालक यांचे असली चेहरे समोर येवू शकते …

Previous articleखतरनाक :- कोळसा माफियानीच घेतली त्या चार कोळसा चोरीच्या ट्रक चालकांची जमानत ?
Next articleदखलपात्र :- पैनगंगा कोळसा चोरी प्रकरणात पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह ? सीबीआय चौकशीची मागणी ! अनेक वेकोली अधिकारी येणार गोत्यात !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here