Home चंद्रपूर दखलपात्र :- पैनगंगा कोळसा चोरी प्रकरणात पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह ? सीबीआय चौकशीची...

दखलपात्र :- पैनगंगा कोळसा चोरी प्रकरणात पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह ? सीबीआय चौकशीची मागणी ! अनेक वेकोली अधिकारी येणार गोत्यात !

गडचांदूर पोलिसांची जुन्याच घूग्गूस पोलिस स्टेशनच्या एफआईआर वर चौकशी सुरू. ट्रांसपोर्टर यांची कसून विचारपूस केल्यानंतर पत्रकारांची होणार पेशी, मात्र चोरीचा कोळसा वाहतूक करणाऱ्या त्या ट्रक मालकाकडून पोलिसांनी केली वसुली ? चर्चेला उधाण ! या प्रकरणी वेकोली विजिलेन्स तपास करण्याची शक्यता!

कोळसा चोरी भाग – ८

चंद्रपूर प्रतिनिधी :-

पैनगंगा कोळसा खाणीतून निघालेल्या कोळशाच्या तीन ट्रक गाड्या ह्या घूग्गूस सायडिंग वर खाली न करता नागाडा येथील अख्तर सिद्दिकी यांच्या बेकायदेशीर कोळसा टालवर खाली करून लाखो रुपयाची कोळसा चोरी झाल्याची बाब उघड झाल्यानंतर हे प्रकरण घूग्गूस पोलिस स्टेशन मधून गडचांदूर पोलिस स्टेशन मधे वर्ग करण्यात आले होते,

या प्रकरणात गडचांदूर पोलिसांनी केवळ महा प्रबंधक अजय सिंह यांचे बयान, ट्रांसपोर्टर कंत्राटदार व कोळसा टाल चालक यांची विचारपूस व आता दोन पत्रकारांचे होणारे बयान यावरच ते स्थिरावणार आहे त्यामुळे  तेथील पोलिसांनी या प्रकरणाचा तपास ज्या दिशेने करायला हवा होता तो न करता केवळ यातून आपली कशी चांदी करता येते यावरच लक्ष केंद्रित केले असल्याने  या प्रकरणातील खरे आरोपी हे पडद्याआड झाले असून केवळ चार ट्रक ड्रायवर यांना बळीचा बकरा बनविल्या गेले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अर्थात  या प्रकरणात पोलिस तपास हा सखोल न होता खऱ्या आरोपींना त्यात वाचविले जाणार असल्याची शक्यता असल्याने या प्रकरणी सीबीआई चौकशी व्हावी अशी मागणी आता होऊ लागली आहे, आलेल्या माहितीनुसार पैनगंगा कोळसा चोरी प्रकरणी वेकोली चा विजिलेन्स विभाग चौकशी करणार अशी शक्यता आहे , मात्र या गंभीर प्रकरणाची तक्रार व निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे यांनी केंद्रीय कोळसा मंत्री, सीबीआई डायरेक्टर रुषि कुमार शुक्ला, कोल इंडिया चेअरमन कलकत्ता यांच्या सह वेकोली सीएमडी नागपूर यांना दिले असल्याने या प्रकरणी सीबीआई तपास झाल्यास पैनगंगा कोळसा प्रकल्पातून किती कोळसा घूग्गूस सायडिंग वर आला आणि किती कोळशाची चोरी झाली याचा निश्चित आकडा समोर येवून पडद्यामागे असणारे कोळसा माफिया यांचे वेकोली अधिकारी कनेक्शन समोर येऊ शकते, अर्थात वेकोली अधिकारी हे कोळसा चोरी प्रकरणात किती गुंतले आहे आणि वेकोलीचा  किती कोटीचा कोळसा चोरी झाला आहे, याचा तपास होऊन या क्षेत्रातील वेकीली अधिकारी गोत्यात येणार असल्याचे संकेत आहे. मात्र आता या प्रकरणाचा तपास ज्या गडचांदूर पोलिसांकडे आहे ते नेमकी काय भूमिका वाजवतात त्याकडे सध्यातरी सर्वांचे लक्ष लागले आहे …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here