Home कोरपणा दखलपात्र :-अल्ट्राटेक मुख्य प्रवेशद्वारा जवळ रेड झोन ऑरेंज झोन जिल्ह्यातील वाहनांची गर्दी?

दखलपात्र :-अल्ट्राटेक मुख्य प्रवेशद्वारा जवळ रेड झोन ऑरेंज झोन जिल्ह्यातील वाहनांची गर्दी?

बाहेर जिल्हातुन येणाऱ्या या वाहणामुळे स्थानिक नागरिकांमधे भीतीचे वातावरण ?

प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :-

कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सीमेंट उद्योग नुकताच सुरू झाला आहे. लॉकडाऊण नंतर उद्योग सुरू होताच जड़ चार चाकी,सहा ते सोळा चाकी वाहनांची गर्दी वाढली असून ही वाहने रेड झोन व ऑरेंज झोन जिल्ह्यातून येत असल्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ मोठया ट्रकची पार्किंग नांदा- फाटा, गडचादूर रोडवर करण्यात येत आहे .आज सकाळ्पासून जवळपास 70 ते 80 ट्रक रोड वर उभ्या करण्यात आल्या यात वाहन चालक सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करीत असून ट्रक चालकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. ट्रकांची लांबच लाबं रागा लागल्याने जीवनावश्यक वस्तुंसाठी आलेल्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कंपनी प्रशासनानी आपल्या परिसरात वाहने उभी करण्याची गरज आहे. परंतु तसे न करता रोडवरच गाडया उभ्या केल्याने अनेक नागरिकाना अडचन निर्माण झाली आहे एकीकडे कंपनी परिसरात कोरोना संसर्ग येऊ नये यासाठी मोठी खबरदारी घेतली जात आहे. मात्र दुसरीकडे प्रवेशदाराबाहेर अनेक गर्दि वाढत असल्याने कोरोना होन्याची भिती नागरिकामध्ये व्यक्त केली जात अाहे. *मराठवाड़ा यवतमाळ वरुन ट्रका दाखल !
अल्ट्राटेक सीमेंट कंपनीचे सीमेंट नेण्याकरिता मराठवाडयातील नांदेड,तसेच यवतमाळ येथून आज अनेक ट्रका नांदा फाटा येथे आल्या आहे.या दोनही जिल्हयात कोरोनाचे रुगण असुन त्या ठिकाणाहुन कपनीत ट्रक येत असल्याने व चालक बिनधास्त मॉस्क न लावता फिरत असल्याने स्थानिक नागरीकामध्ये भितीचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here