Home चंद्रपूर धक्कादायक :- बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या दोन हजार रुपयासाठी दलाल घेताहेत ही रक्कम...

धक्कादायक :- बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या दोन हजार रुपयासाठी दलाल घेताहेत ही रक्कम !

बांधकाम कामगारांची आर्थिक लुबाडणूक थांबवा गौतम गेडाम यांची प्रशासनाकडे  मागणी !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भामुळे दिनांक २४ मार्च पासून संचारबंदीसदृश परिस्थितीत आहे. पण हातावर आणून-पानावर खाणाऱ्या जनतेचा रोजगार हिरावला गेला आहे.
लॉक-डाउनमुळे लाखो मजूर इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे अडकून पडले आहे.चालता चालता मृत्यू ओढावल्याच्याही संख्या खूप आहेत.भुखमारीच्या संख्याही खूप आहे. त्यामुळे अश्या प्रसंगी कोणीही उपाशीपोटी राहु नये म्हणून बांधकाम कामगारांना दोन हजार रुपयांची मदत शासनाने जाहीर केली. परंतु बांधकाम कामगारांकडून दलाली खाल्याशिव्याय तेही दोन हजार रुपये सहजा सहजी बांधकाम कामगारांना मिळू न देण्याचा चंगच काही दलालांकडून बांधला गेला आहे.

बांधकाम कामगारांना दोन हजार रुपये मिळवून देण्यासाठी दलाल लोक एक फॉर्म भरून घेत आहेत. त्या फॉर्म चे तीनशे ते चारशे रुपये घेत आहेत.
अश्या पध्दतीने टाळूवरचे लोणी खाण्याचे याही परिस्थितीत प्रकार ते दलाल करीत असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू असल्याने  सामाजिक कार्यकर्ते गौतम गेडाम यांनी प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली आहे.

अगोदरच याच दलालांनी दोन दोन हजार रुपये घेऊन बोगस बांधकाम बोगस लाभार्थीची निवड केली होती.
या दलालांचे कामगार आयुक्त कार्यालयात लागेबांधे असल्याचे दिसून येत आहे. किशोर जोरगेवार आमदार नसतांना त्यांनी खूप जोरदारपणे या दलालांविरोधात आवाज बुलंद केला होता. आता किशोर जोरगेवार आमदार आहेत त्यामुळे ते अशा सर्वच दलालांवर  आणि कामगार आयुक्त ऑफिस मधील संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करिता समोर येईल का ? अशी रास्त अपेक्षा चंद्रपुर शहरातिल जनता व्यक्त करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here