Home चंद्रपूर चंद्रपुर जिल्हा शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री साहाय्यता निधिला  १,११,१११ रुपयाचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द...

चंद्रपुर जिल्हा शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री साहाय्यता निधिला  १,११,१११ रुपयाचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द !

जिल्हा प्रमुख संदिपभाऊ गिर्हे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने शिवसैनिकांचा उपक्रम !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

कोरोना संकटावर मात करण्यासाठी देशातील लाखो हात मदतीसाठी सरसावले असून आपले वाढदिवसावर  आणि सामाजिक सांस्क्रुतिक समारंभात खर्च होणार पैसा हा मुख्यमंत्री सहायता कोषात  देवून कोरोना च्या या लढाईत आपला सहभाग नोंदविला जात आहे, अशाच प्रकारची सहायता शिवसेना व युवासेनेच्या वतिने जिल्हाप्रमुख संदीप गीर्हे यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने डॉ. कुणाल खेमणार जिल्हाधिकारी साहेब,चंद्रपूर यांना मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश देण्यात आला. जगात सर्वीकडे कोरोनाच संकट ओढावल्यामुळे आपल्या भारतात सुद्धा त्याचे सावट मोठे आहे. या संकटकाळी गरीब गरजू लोकांना जीवन जगतांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
एक महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आणि आपल सामाजिक कर्तव्य समजून आम्ही सर्व शिवसेना, युवासेना पदाधिकारी तथा शिवसैनिक यांनी २४ एप्रिलला 2020 ला चंद्रपूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्य कुठलाही दुसरा खर्च न करता तो निधी या शुभ दिनाचे औचित्य साधून, त्यांच्या मार्गदर्शनात आणि त्यांच्या  हस्ते १ लाख अकरा हजार *एकशे अकरा रुपये* धनादेश मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये एक छोटीशी मदत म्हणून दिली आहे.

तसेच चंद्रपुर शिवसेना व युवासेनेच्या वतिने दररोज दोन हजार लोकांना भोजनदान, गरीब व गरजु लोकांना अन्नधान्याची किट वाटप व रक्तदान शिबीर ही घेण्यात आले. यावेळी चंद्रपुर महानगर शिवसेना प्रमुख प्रमोद पाटील, शिवसेना तालुका प्रमुख संतोष नरुले, युवासेना तालुका प्रमुख हेमराज बावणे, स्वप्निल काशीकर, विक्रांत सहारे, निलेश बेलखेडे, गिरीष करारे, गडचांदुरचे नगरसेवक धनंजय छाजेड, अहिरकर,ठाकुरवार,अक्षय अंबिरवार,प्रणय धोबे, घुग्गुस युवासेनेचे चेतन बोबडे व मंगल शेंडे उपस्थित होते.

Previous articleसणसणीखेज :- पैनगंगा कोळसा चोरी प्रकरणात कोळसा माफिया सोबत पत्रकारांची होणार पोलिस चौकशी ?
Next articleईरई नदीच्या काठावर महूआ दारू बनवितांना दुर्गापूर पोलिसांनी टाकली धाड !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here