Home चंद्रपूर ईरई नदीच्या काठावर महूआ दारू बनवितांना दुर्गापूर पोलिसांनी टाकली धाड !

ईरई नदीच्या काठावर महूआ दारू बनवितांना दुर्गापूर पोलिसांनी टाकली धाड !

दुर्गापूर पोलिसांची मोठी कारवाई !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

सध्या लॉक डाऊन च्या काळात देशी विदेशी दारू चे स्त्रोत बंद झाल्याने तळीरामाना आता महूआ दारूचा आधार तेवढा शिल्लक असल्याने महूआ मोहफूला पासून दारू बनविण्याचे काम जिल्ह्यात सर्वत्र युद्धपातळीवर सुरू आहे, मात्र बंदोबस्तात असलेले पोलिस आता अशा महूआ दारू बनविण्याच्या देशी जुगाडावर धाड टाकून तळीरामाच्या अशा अपेक्षेवर जणू पाणी फेरत असल्याचे बोलल्या जात आहे.

दुर्गापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ईरई नदीच्या काठावर असेच एक देशी जुगाड लाऊन मोहफूला ची दारू बनवित असल्याची माहीती मिलताच पोलिस उपनिरीक्षक प्रवीण सोनोने यांच्या नेत्रुत्वात व पोलिस निरीक्षक खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील गौरकार, अशोक मंजुळकर व उमेश वाघमारे यांच्या पथकाने धाड टाकून पूर्ण साहित्यासह महूआ बनविण्यासाठी वापरलेल्या सर्व साहित्याची जब्ती करून अप क्र. /2020कलम 65(फ),(ई),83 म.दा.का. कारवाई केली यामधे मो/सा क्र MH-34 BJ-2434
चा मालक प्रविण सोमा रामटेके रा.पायली व ईतर यांचेवर गुन्हा दाखल केला ही कारवाई 24/04/2020 चे 13/00 ते 16/00 वा करण्यात आली असून यामधे 40 प्लास्टीक ड्रम मध्ये 4000/ लीटर मोहा सडवा किंमत 8,00000/-रू.30 मातीच्या मडक्यात प्लास्टीक डबकीत 600 लिटर मोहा सडवा की.1,20,000/-रु.
मोहाफुल गावठी दारु 150 लीटर की.45000/रु.
मो/सा MH-34 BJ-2434 कि.55,000/रु. 40 प्लास्टीक ड्रम की.20000/रु.असा एकूण 10,40,000/- रु. चा माल.जप्त करण्यात आला आहे.

Previous articleचंद्रपुर जिल्हा शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री साहाय्यता निधिला  १,११,१११ रुपयाचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द !
Next articleब्रेकिंग न्यूज :- त्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी रत्नाकर बोथले फरार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here