Home वरोरा ब्रेकिंग न्यूज :- त्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी रत्नाकर बोथले फरार?

ब्रेकिंग न्यूज :- त्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी रत्नाकर बोथले फरार?

पोलिसांना गुंगारा देवून तालुक्यातील एका गावात लपून बसल्याची शंका !

वरोरा प्रतिनिधी :-.

वरोरा शहरातील एक अल्पवयीन मुलगी घरानजीकच्या औषधी विक्रीच्या दुकानात चॉकलेट घेण्यास गेली असता ती एकटीच असल्याने संधी साधून बोथले मेडिकल स्टोअर्स चे मालक रत्नाकर बोथले यांनी त्या अल्पवयीन मुलीला बाजूच्या खोलीत घेवून जाऊन अत्त्याच्यार करण्याचा प्रयत्न केला असता मुलीने आरडाओरड न करता जवळ असलेली बॉटल त्याला फेकून मारली व तिने तिथून पळ काढला , ही घटना १५ एप्रिल रोजी घडली होती मात्र तिचे वडील हे हिंगणघाटला असल्याने ते इथे आल्यानंतर याबाबत त्याची शुक्रवार तक्रार करण्यात आली.

शुक्रवार ला वरोरा पोलिस स्टेशन मधे आरोपी रत्नाकर बोथले यांचे वर कलम ३५४ अ. व बाल लैंगिक शोषण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असल्याचे पोलिस तपासात दिसून येत आहे. त्यांचा पोलिस कसून शोध घेत आहे,मात्र पोलिसांना गुंगारा देऊन तालुक्यातील एखाद्या गावात त्यांनी आश्रय घेतला असावा अशी शंका व्यक्त होत आहे. या घटनेमुळे वरोरा शहरात आरोपी विरोधात संतापाची लाट असून समाजमन सुन्न झालं आहे. लॉक डाऊन च्या काळात एकीकडे लोक आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घरी आहे तर जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी म्हणून मेडिकल स्टोअर्स चालविली जात असतांना मेडिकल स्टोअर्स चालविणारे रत्नाकर बोथले सारखे नीच व्यक्ती सामाजिक आरोग्यच बिघडवित असल्याने जनतेत मोठा रोष व्यक्त होत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here