Home चंद्रपूर दखलपात्र :- पैनगंगा कोळसा चोरी प्रकरणात त्या संशयित पत्रकारांच्या उलट्या बोंबा, चव्हाट्यावर...

दखलपात्र :- पैनगंगा कोळसा चोरी प्रकरणात त्या संशयित पत्रकारांच्या उलट्या बोंबा, चव्हाट्यावर ?

ट्रक मालका कडून रक्कम घेवूनही तो मी नव्हेच या पत्रकारांच्या भूमिकेचा व्हायरल व्हिडिओ ने केला पर्दापाश ! आपली पोल खुलली म्हणून उलट घूग्गूस पोलिस स्टेशन मधे संपादका विरोधात खोटी तक्रार, आता तो व्हायरल व्हिडिओ पोलिसांकडे देवून त्या खंडणी बहादुर पत्रकारांवर गुन्हे दाखल होणार ?

कोळसा चोरी भाग – १०

खरं तर आता निखळ आणि समाजहिताची पत्रकारिता शिल्लक राहिली नसून या क्षेत्रात चोर बदमाश यांचा शिरकाव झाल्याने पत्रकारितेच्या आडोशाने कुठल्याही मार्गाने पैसे कमविण्याचा हा धंदा झाला आहे. मग त्यामुळे राष्ट्रीय संपतीची चोरी होवो किंव्हा कुणाचा जीव जावो अशा पत्रकारांना त्याचे काही एक सोयरसुतक नसते तर चोरांनी केलेल्या चोरीत आपला आर्थिक लाभ झाला पाहिजे अशीच एक यांची अपेक्षा असते .

घूग्गूस क्षेत्रातील नेहमीच चर्चेत असणारे तथाकथित पत्रकार मनोज कनकम आणि दया तिवारी यांची पत्रकारिता हि घूग्गूस परिसरात नेहमीच वादातीत राहिलेली आहे. कुठल्याही प्रकरणात आपलं चांगभलं व्हावं अशीच यांची रणनीती असते हे सर्वश्रुत आहे. अशातच पैनगंगा कोळसा खाणीतील कोळशाच्या तीन ट्रक घूग्गूस वेकोली सायडिंग वर खाली न होता त्या खाजगी प्लॉट वर खाली होऊन त्या कोळशाची चोरी याच पत्रकारांनी व्हिडिओ घेवून समोर आणली होती व त्यांनी  पैशासाठी महाप्रबंधक अजय सिंह यांचेवर दबाव टाकला होता, मात्र त्यांच्या पैशाच्या मागणीला भीक न घालता त्यांनी सरळ घूग्गूस पोलिस स्टेशन मधे तीन ट्रक ड्रायवर विरोधात गुन्हा दाखल केला होता, यामागे याच दोन पत्रकारांचा कुटील डाव होता. या प्रकरणात महत्वाची बाब म्हणजे त्या तीन ट्रक मालकाकडून पैसे घेतल्यानंतर या पत्रकारांनी नंतर पैनगंगा वेकोली महा प्रबंधक अजय सिंह यांना टार्गेट केले होते की तुम्ही या कोळसा चोरी प्रकरणात सामील आहात, व ते त्या चोरीच्या कोळसा गाड्यांचे व्हिडिओ त्यांना दाखवून जणू ब्लैकमेल करीत होते. त्यामुळे आपला या चोरी प्रकरणात कुठेही समंध नसतांना हे दोन पत्रकार त्यांचे वर दबाव टाकत असल्यामुळे ते व्यथित झाले कारण त्या महा प्रबंधक अजय सिंह ह्यांना सेवानिवृत्त होण्यासाठी अवघा काही महिन्याचा कालावधी शिल्लक असल्यामुळे हा कलंक आपल्या माथी लागू नये म्हणून त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून त्यांनी दिनांक १४ मार्च च्या कोळसा चोरी प्रकरणाची तक्रार दिनांक ९ एप्रिलला घूग्गूस पोलिस स्टेशन मधे दिली व त्या तीन ट्रक चालकाविरोधात तक्रार देवून गुन्हे दाखल केले, त्यामुळे या तथाकथित पत्रकारांची पोल खूलणार हे निश्चित होते कारण त्यांनी अगोदरच त्या तीन आरोपी ट्रक चालकांच्या मालकाकडून रक्कम घेतली होती, परंतु  आपल्या कडून पैसे घेतल्यावर पत्रकार बदलून जाऊ नये म्हणून गौतम नावाच्या ट्रक मालकांनी पुरावा म्हणून पत्रकारांना पैसे देतांनाचा एक व्हिडिओ काढला होता, विशेष म्हणजे त्यावेळी कोळसा चोरी संदर्भातील व्यक्ती त्या व्हिडिओ मधे दिसत आहे, अर्थात तो व्हिडिओच आता पत्रकारांच्या मानगुटीवर बसला असल्याचे चित्र दिसत आहे.

या कोळसा चोरी प्रकरणात भुमीपुत्राची हा न्यूज पोर्टल वरून सतत बातमी प्रकाशित होऊन राष्ट्रीय संपती ची चोरी खुलेआम होतं असल्याने एक राष्ट्रीय कार्य म्हणून वेकोली प्रशासन व पोलिस प्रशासन यांच्या निदर्शनात यावं व या प्रकरणाची सीबीआई चौकशी व्हावी या ऊद्दात्त हेतूने या प्रकरणात गुंतलेल्या सर्वांची पोलखोल सुरू आहे. महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणात हे दोन पत्रकार कसे गुंतले आहे हे त्यांच्या एकूण हालचाली वरून स्पष्ट होते, कारण दिनांक १४ मार्चला घडलेले प्रकरण हे या पत्रकारांनी आपल्या प्रतिनिधी असलेल्या व्रूत्तपत्रात आतपर्यंत का प्रकाशित केलं नाही ? हे म्हणतात की आम्ही वेकोली प्रशासनाच्या बाजूने सरकारी साक्षीदार म्हणून अहो तर हे एखाद्या प्रकरणात केवळ साक्षीदार होण्यासाठी पत्रकारिता करीत आहे का ? व्हिडिओ मधे ज्याअर्थी कोळसा चोरीच्या ट्रक मालकानी पत्रकारांना पैसे दिल्याचे स्पष्ट होतं आहे तर त्या ट्रक ड्रायवर वर पोलिस केस कशा ? घूग्गूस परिसरातील वेकोली कोळसा माफियासोबत साठगांठ करून पैसे कमावीण्याची ही कसली पत्रकारिता ? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे स्वतः यांच्याकडे नसतांना भुमीपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर त्यांच्या बाबत बातमी येताच ते आपली यानंतर पोल खुलू नये याकरिता बदनामी झाली असे भासवून चक्क घूग्गूस पोलिस स्टेशन मधे जे एसीसी सिमेंट कंपनी च्या नॉट फॉर सेल च्या सिमेंट बैंगा चोरी प्रकरणात आरोपी आहे त्या राजु रेड्डी यांना घेवून जावून संपादकांची तक्रार करतात म्हणजे “चोरांच्या उलट्या बोंबा” असेच म्हणावे लागेल, मात्र आता या कोळसा चोरी प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक, पोलिस महानिरीक्षक , पोलिस आयुक्त आणि सीबीआई यांच्याकडे पत्रकारांच्या त्या व्हिडिओ सह लेखी तक्रार करून या प्रकरणात अडकलेल्या सर्वांची चौकशी करण्यास भाग पाडू असे संपादक राजु कुकडे यांनी जाहीर केले आहे.

Previous articleकोरपना यथे सुगंध तंबाकू व खर्रा विक्री जोरात चालू प्रशासन करत आहे दुर्लक्ष।
Next articleधक्कादायक :- रेड झोन असलेल्या तेलंगानातून मजुरांचा चंद्रपूर मधे प्रवेश !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here