Home चंद्रपूर धक्कादायक :- रेड झोन असलेल्या तेलंगानातून मजुरांचा चंद्रपूर मधे प्रवेश !

धक्कादायक :- रेड झोन असलेल्या तेलंगानातून मजुरांचा चंद्रपूर मधे प्रवेश !

लपत छपत आलेल्या सोळा मजदुरांना चंद्रपूरात केले “क्वारनटाईन”

चंद्रपूर प्रतिनिधी :

देशात स्थानांतरण मजुरांचा विषय गंभीर झाला असून देशातील प्रत्त्येक राज्यात अडकून पडलेल्या मजुरांना स्वतःच्या राज्यातील गावाला जाण्याची चिंता सतावत असून कुठल्याही परिस्थितीत आपल्या गावाला जाण्यासाठी त्यांची सर्कस सुरू आहे, मात्र प्रशासन त्यांना त्यांच्या गावाला जावू दिल्या जात नसल्याने ते लपून छपून आपल्या गावाचा मार्ग शोधत आपला गाव जवळ करीत आहे, असाच प्रकार आज रविवार दिनांक 26 रोजी घडला असून तेलंगणा हैदराबाद येथून छत्तीसगड येथील बालाघाटी येथे जाणाऱ्या 16 ते 17 मजुरांना पठाणपुरा गेट जवळ पकडण्यात आले व त्यांना तपासणीनंतर क्वारनटाईन करण्यात आले. चंद्रपुरातील पठाणपुरा येथील मंदिराजवळ चोर मार्गाने येताना काही मजदुरांना सुज्ञ नागरिकांनी थांबविले. विचारपूस केली असता हे मजदूर तेलंगणातील हैदराबाद येथून पायदळ प्रवास करीत चंद्रपूरला धडकले होते. त्यांचे सोबत महिला व लहान मुले होती. त्यांना हीवरपुरी च्या हनुमान मंदिरापाशी थांबून आरोग्य तपासणी करून या 14 जणांना चंद्रपूरातील फुले प्राथमिक शाळेत क्वारनटाईन करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे तेलंगानातुन चंद्रपूर कडे येणार्या मजूरांचा लोंढा येणाऱ्या काळात चंद्रपूर साठी धोक्याचा ठरू शकतो. महामार्गावर होणारी कडक तपासणीतून मार्ग काढीत या मजुरांना चोर मार्गाचा अवलंब करावा लागत आहे, ही चंद्रपूर साठी धोक्याची घंटा आहे. नुकतेच चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमणार यांनी जिल्ह्यामध्ये परराज्यातून येणाऱ्या तसेच जिल्ह्याबाहेरून येणाऱ्यांची माहिती प्रशासनाला द्यावी असे नागरिकांना आवाहन केले आहे. चंद्रपुरात मुख्य मार्गावर असलेली लागलेले बॅरिकेट्स, कठडे हे सगळेच चंद्रपूरच्या सुरक्षेसाठी आहेत. चंद्रपूर करांनी घरातच लावून लाॅकडाऊन च्या आदेशाचे पूर्ण पालन केले आहे व करीत आहे, परंतु बाहेरून येणारा मजुरांचा लोंढा आता थांबता थांबत नाही. त्यासाठी प्रशासनाने कडक उपाय योजना करणे गरजेचे आहे.

Previous articleदखलपात्र :- पैनगंगा कोळसा चोरी प्रकरणात त्या संशयित पत्रकारांच्या उलट्या बोंबा, चव्हाट्यावर ?
Next articleखतरनाक :- 20 एप्रिल ला मोदी सरकारचा R.B.I.संदर्भात एक मोठा निर्णय!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here