Home कोरपणा खळबळजनक :- अंबुजा सिमेंट कंपनीच्या औद्यागिक व संस्थात्मक ग्राहक वापराच्या सिमेंटची खुल्या...

खळबळजनक :- अंबुजा सिमेंट कंपनीच्या औद्यागिक व संस्थात्मक ग्राहक वापराच्या सिमेंटची खुल्या बाजारात विक्री.

गढचांदूर पोलीस स्टेशनला हारुन सिद्दीकी.ज्ञानेश्वर काकडे , नामदेव पानघाटे यांच्या विरोधात गुन्हाची नोंद.कंपनी व्यवस्थापन संशयाच्या भोवर्यात.

गडचांदूर प्रतिनिधी :-

अंबुजा सिमेंट कंपनी च्याऔद्योगिक व संस्थात्मक ग्राहक वापरासाठीचे सिमेंट खुल्या बाजारात विकत असल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने या सिमेंट विक्री मधे अंबुजा सिमेंट व्यवस्थापन यांचा किती सहभाग आहे. यावरही सर्व काही अवलंबून आहे. दोन वर्षापूर्वी एसीसी  सिमेंट कंपनीच्या असेच नॉट फॉर सेल सिमेंट बैगा चोरी प्रकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजु कुकडे यांनी समोर आणले होते व घूग्गूस येथील राजु रेड्डी हया कंत्राटदारावर गुन्हे दाखल झाले होते आणि नंतर कंपनी व्यवस्थापन यांच्या भ्रष्ट नितीमुळे या प्रकरणाची सीआयडी चौकशी सुद्धा झाली होती. हे विशेष .

 

नांदाफाटा येथे खाजगी घर बांधकामाकरीता औद्योगिक व संस्थात्मक ग्राहक वापराचे अंबुजा कंपनीचे सिमेंट वापर करीत असल्याचा सुगावा पोलिसांना मिळाल्याने लागलीच गडचांदूर पोलीसांनी सिद्दिकी यांचे घर बांधकामावरुन जवळपास ३५ बोरी भरलेले सिमेंट जप्त करून तीन जणाविरोधात २९ मे रोजी भांदवी कलम ४०६ ,४२० व ३४ अन्वये गुन्हा नोंद केला असून तपास सुरु आहेत

सविस्तर वृत्त असे की , नांदाफाटा चौकातील हारुण सिद्दिकी यांच्या घराचे स्लॅबचे काम सुरु होते यासाठी ८० बॅग सिमेंट रस्त्याच्या कडेला उघड्यावर ठेवून वापर चालु होता सिमेंट बॅगवर इंग्रजीमध्ये इंडस्ट्रियल / इंस्टिट्यूशनल कन्जूमंरस , नाॅट फाॅर रिटेल / रिसेल असे लिहिले होते सदरचे सिमेंट खाजगी बांधकामाला वापरता येत नसल्याने कोणीतरी सिमेंट बोरीचे फोटो घेऊन पोलीसांना माहिती दिली पोलीसांनी लागलीच सिद्दिकी यांचे बांधकामावरुन जवळपास ३५ बोरी भरलेले सिमेंट व ४५ वापर केलेले खाली बॅग पंचासमक्ष जप्त करुन हारुण सिद्दिकीं , ज्ञानेश्वर काकडे , नामदेव पानघाटे यांचेवर भांदवीचे कलम ४०६ , ४२० व ३४ अन्वये गुन्हा नोंद केला असून गढचांदूर पोलीस कसून तपास करीत असल्याची माहिती आहे सरकारी कामावरील सिमेंट कमी किमतीत आणून बांधकाम करीत असल्याची चर्चा परीसरात चांगलीच पसरली देवकते कन्स्ट्रक्शनचे औद्योगिक व संस्थात्मक ग्राहक वापराचे अंबुजा कंपनीचे सिमेंट नांदाफाट्याला दुसऱ्याच्या नावावरचे कसे काय पाठविण्यात आले याबाबत सखोल चौकशी गरज आहेत

यावर प्रतिक्रिया देतांना हारुन सिद्दीकी यांनी म्हटले आहे की “माझे घराचे बांधकाम सुरु आहेत आवश्यकतेनुसार दुकानदाराला फोन करुन सिमेंट मागवित होतो २९ मे रोजी स्लॅबचे काम असल्याने मी काकडे यांचेकडून ८० बॅग सिमेंट बोलाविले ज्याचे बिल मला दिले आहे चोरीचे अथवा सरकारी कामातील सिमेंट असते तर रस्त्याच्या कडेला सिमेंट ठेवले नसते पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून तपासात मी सहकार्य करीत आहो”

या प्रकरणात कंत्राटदार नामदेव पानघाटे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले आहे की “तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे रस्ते , इमारत व नाली बांधकामाचे कंत्राट घेऊन मी काम करीत असतो महिन्याकाठी १००० ते १५०० सिमेंट बोरीची गरज असल्याने कधी कधी सिमेंटचा ट्रक बोलवित असतो लाॅकडाऊन मध्ये १०० बोरी सिमेंट काकडे ट्रेंडर्स करुन घेतले होते देवकते कन्स्ट्रक्शन यांचे नावावर पैसे भरून ५२० बोरीचा सिमेंट ट्रक खरेदी केला असून यातुन काकडे यांचे १०० बोरी सिमेंट मी परत केले तेच सिमेंट त्यांनी सिद्दिकींना दिले यात सरकारी अथवा चोरीचा प्रकार नाही गावगाड्यातील नातेसंबंध जोपासावे लागतात कसलाही गैरप्रकार केला नाही चौकशीत सहकार्याची भुमिका आहे.”

Previous articleब्रेकिंग न्यूज :- राजबिहारी अग्रौ मधे कापसाच्या साठ्याला भीषण आग.
Next articleसनसनी :- लॉक डाऊन के बाद एसीसी कंपनी मे मशीनो की सही जाँच नही होनेसे हुवा बडा हादसा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here