Home भद्रावती मागणी :- जेष्ठ पत्रकार संजयजी भोकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करा .

मागणी :- जेष्ठ पत्रकार संजयजी भोकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करा .

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई शाखा तालुका भद्रावती यांची मागणी.

भद्रावती प्रतिनिधी :-

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे माजी महाराष्ट्र अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार संजयजी भोकरे यांनी पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या सर्वोच्य योगदानाबद्दल त्यांना विधान परिषदेत आमदारकी द्यावी ही मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा भद्रावती च्या वतीने तहसीलदार महेश शितोडे यांना दिलेल्या निवेदनातूंन करण्यात आली आहे.  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संस्थापक तथा जेष्ठ पत्रकार संजयजी भोकरे हे महाराष्ट्रातील एक शिक्षणतज्ञ,क्रीडा क्षेत्रातील छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते आणि थोर समाजसेवक आहेत.ते अनेक वर्षापासून पत्रकारित क्षेत्रात कार्यरत आहेत. जेष्ठ संपादक असलेले संजयजी भोकरे हे श्री अंबाबाई तालीम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी सांगली सारख्या ग्रामीण भागात अभियंत्रीकीच्या शिक्षणाची दारे खुली केली.शिवाय याच संस्थेमार्फत अनेक पहेलवान घडविले.त्यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकाराच्या न्याय हक्कासाठी राज्यभर जाळे निर्माण केले. शिवाय पत्रकार संघात आघाडीचे चैनल ,दैनिकाचे संपादक,वृत्तसंपादक,पत्रकार,बातमीदार, वार्ताहर जोडले गेले आहेत. पत्रकार संरक्षण कायदा अमलात यावा यासाठी त्यांनी शासन स्तरावर फार मोठा लढा दिला व पत्रकार सरक्षण कायदा करण्यास शासनास भाग पाडले.

त्यांनी पत्रकारितेत नवे आयाम जोडून राज्य पत्रकार संघाबरोबर पूर्ण देशभरात पत्रकाराचे व्यासपीठ असावे म्हणून ऑल इंडिया जर्नलिस्टची स्थापना केली. नवी दिल्लीत या संघटनेचे मोठे कार्यालय सुरु आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना साथीच्या काळात त्याच्याच मार्गदर्शनाखाली राज्यातील पत्रकार संघाच्या सदस्यांनी गरजूंना किराणा, धान्य ,जीवनाशक वस्तूचे वाटप करून देशसेवेचा वाटा उचलला. थोडक्यात सांगायचे झाल्यास संजयजी भोकरे हे अष्टपैलू व्यक्तीमत्व असून त्यांचे पत्रकारिता शिक्षक, क्रीडा व समाजसेवक या क्षेत्रात महत्वाचे योगदान आहेत त्याच्या सारख्या व्यक्तीची विधान परिषदेवर नियुक्ती झाल्यास महाराष्ट्रातील अनेक समस्या सुटतील व  महाराष्ट्राचा विकास होईल तसेच शिक्षण क्षेत्राचा आणी प्रसार माध्यमातील तमाम जनतेला न्याय मिळेल.त्यामुळे संजयजी भोकरे यांची विधान परिषद सदस्य पदावर नियुक्ती करून आम्हा पत्रकारांस न्याय द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुबाईच्या भद्रावती तालुका शाखेतर्फे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली यावेळी  वेळी अध्यक्ष ईश्वर शर्मा, कार्याध्यक्ष अशोक पोतदार, उपाध्यक्ष वतन लोने, सरचिटणीस अब्बास अजानी,संघटक जावेद शेख, प्रसिद्ध प्रमुख उमेश कांबळे, तथा सदस्य गण रूपचंद धारणे,सुनील बिपटे, सुनील पतरंगे,शाम चटपल्लीवार,शंकर बोरघरे, संतोष शिवणकर,महेश निमसटकर उपस्थित होते यावेळी पत्रकार संघाचे जेष्ठ सदस्य रूपचंद धारणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Previous articleधक्कादायक :- आदिलाबाद चंद्रपुर लोणी फाटा माहामार्गवर दूव्हिलरचा भीषण अपघात 1जागीच ठार.
Next articleबंदर कोळसा ब्लॉक लीलाव रद्द करण्याची पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचेकडे इको-प्रो ची मागणी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here