Home चंद्रपूर थरारक :- एक महिलेने ऑटोमधेच एका गोंडस बाळाला दिला जन्म.

थरारक :- एक महिलेने ऑटोमधेच एका गोंडस बाळाला दिला जन्म.

जिल्हा सामान्य रूग्णालयात भर्ती घेण्यास मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली होती मनाई. मनसे कार्यकर्त्यांनी वरिष्ठांना फोन करताच आई बाळावर उपचार सुरू !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्हा सामन्य रुग्णालयातील कर्मचार्यांचा बेजबाबदारपणा नेहमीच रुग्णांसाठी गैरसोय निर्माण करणारा ठरत असल्याची नेहमीच ओरड होत असताना वेळेवर दवाखान्यात जाण्यासाठी साधन नसल्याने खाजगी ऑटोमधे माधूरी पंकज येनगंटीवार मु.राजनगर आरवट रोड चंद्रपूर नामक महिलेला काल दिनांक 25/06/2020 सायंकाळच्या सूमारास जिल्हा सामान्य रुग्णालयातआणत असताना प्रसुती कळा जोरात आल्याने तिने जयंत टाकिज चौकातच एका गोंडस बाळाला जन्म दिल्याचा थरारक प्रसंग समोर आला. मात्र त्यावेळी आशा वर्कर्स सोबत असल्याने आई आणि बाळ सुरक्षितपणे राहिले.

मात्र नंतर जिल्हा सामान्य रूग्नालयात त्यांना आनन्यात आले, पण इथे काही विचित्रच घडले, त्या मायलेकांना कुणीही कर्मचारी दवाखान्यात घेत नव्हते तर त्यांचावर उलट सूलट प्रश्न करीत होते कोणतेही नर्स याकडे लक्ष देत नव्हत्या, आशावर्कर यांच्या सोबत सुद्धा त्या अरेरावी करीत होत्या इतकेच नव्हे तर बाळाची नाळ सुद्धा सफाईकामगार महिलेनी कापली हा सर्व प्रकार मनसेचे रूग्नमित्र क्रिष्णा गुप्ता आणि मनविसे तालूका उपाध्यक्ष प्रविण शेवते यांना भ्रमनध्वनी वरून समजताच त्यांनी तात्काळ जिल्हासामान्य रूग्नालयात जावून वरिष्ठांना फोन केला आणि माधुरी येनगंटिवार व तिच्या बाळाला बेडची व्यवस्था करून दिली. त्यामुळे मनसेचे क्रिष्णा गुप्ता आणि प्रविण शेवते वेळेवर दाखल झाले नसते तर त्या मायलेंकावर काय संकट ओढावले असते ? याची कल्पनाही आपण करू शकत नाही एवढे बेजबाबदार जिल्हा सामान्य रूग्णालयाचे कर्मचारी असून मनसेच्या त्या समाजसेवक कार्यकर्त्यांचे त्या पीडित महिलेने मनापासून आभार मानले आसवे असेच एकूण चित्र त्यावेळी निर्माण झाले होते.

Previous articleखळबळजनक :- चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी सापडले १० कोरोना बाधित रुग्ण,वरोरा तालुक्यात ७ 
Next articleआंदोलन :- ताडोबा बफर झोन सिमेला लागून कोळसा ब्लॉक लिलाव रद्द करण्यासाठी मनसेचे आंदोलन !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here