Home चंद्रपूर आंदोलन :- ताडोबा बफर झोन सिमेला लागून कोळसा ब्लॉक लिलाव रद्द करण्यासाठी...

आंदोलन :- ताडोबा बफर झोन सिमेला लागून कोळसा ब्लॉक लिलाव रद्द करण्यासाठी मनसेचे आंदोलन !

वाघाचे भ्रमणमार्ग बंद होऊन जंगलातील वन्यप्राण्याचा नाश होण्याची भीती ! केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना निवेदन !

चिमूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्हा हा औधौगिक जिल्हा असला तरी तो वनसंपदेनी नटलेला व ताडोबा अभ्ययरण यामुळे भारतातील पर्यटकांना मोहित करणारा जिल्हा म्हणून सुद्धा प्रशीद्ध आहे. पण केंद्र शासनाची या अभयारण्याकडे वक्रद्रुष्टी नेहमीच पर्यावरण व प्रेमींसाठी डोकेदुखी ठरत आहे. सन २०१० मधे तत्कालीन काँग्रेस सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात दोन कोळसा ब्लॉक मंजूर केले होते. त्यामधे लोहरा जवळ व चिमूर जवळील बंदर शिवापूर परिसरात असे दोन कोळसा ब्लॉक विरोधात आंदोलने झाली त्यामुळे तात्कालिन केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी त्या कोळसा ब्लॉक मंजुरी मिळू दिली नाही. मात्र आता तब्बल १०त् वर्षानंतर मोदी सरकार जे उधोगपतीसाठी काम करते त्या सरकारनी जुनी फाईल खोलून नव्याने बंदर कोळसा ब्लॉक चा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याने केंद्र शासनाच्या या लिलावाला चंद्रपूर मनसे तर्फे तीव्र संताप व्यक्त करून मनसे तर्फे प्रत्यक्ष बंदर शिवापूर शिवारात आज दिनांक २६ जुन रोजी आंदोलन करण्यात आले . या आंदोलनात केंद्र सरकार मुर्दाबाद आणि वाघ वाचवा. जंगल वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या

ताडोबाच्या बफर सिमेस लागून बंदर कोळसा ब्लॉक लीलाव रद्द करण्यात यावे या मागणी करिता वेगवेगळे आंदोलन करण्यात येत आहे. मात्र मनसेचे हे प्रत्यक्ष कोळसा ब्लॉक स्थळावर आंदोलन चर्चेचा विषय बनला असून मनसे तर्फे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावड़ेकर यांना लीलाव रद्द करण्या संदर्भात निवेदन देवून केंद्र सरकारचा हा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
या प्रसंगी मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत कोल्हे. जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे.जिल्हा उपाध्यक्ष सचिन भोयर, शहर अध्यक्ष मनदिप रोडे. महिला जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड. कुलदीप चंदनखेडे ,मनोज  तांबेकर.विवेक धोटे. प्रकाश नागरकर. करण नायर. नितीन टेकाम. महेश शास्त्रकार.अक्षय चौधरी. महेश पराडकर व इतर मनसैनिक उपस्थित होते.

Previous articleथरारक :- एक महिलेने ऑटोमधेच एका गोंडस बाळाला दिला जन्म.
Next articleधक्कादायक :- भद्रावती शहरात आढळले आणखी २ कोरोना बाधित रुग्ण !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here