Home भद्रावती धक्कादायक :- भद्रावती शहरात आढळले आणखी २ कोरोना बाधित रुग्ण !

धक्कादायक :- भद्रावती शहरात आढळले आणखी २ कोरोना बाधित रुग्ण !

आता पर्यंतची  बाधित संख्या ७४. २६ अॅक्टीव्ह ; ४८ रुग्ण झाले बरे !

कोरोना अपडेट :-

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात दोन नागरिक कोरोना बाधित आढळले आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार भद्रावती शहरातील गणपती वार्ड येथील मुंबईवरून परत आलेला २२ वर्षीय युवक कोरोना बाधित झाला आहे. २२ जून रोजी मुंबईवरून आल्यानंतर या युवकाला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. काल स्वॅब नमुना घेतल्यानंतर आज २६ जून रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दुसरे ५३ वर्षीय व्यक्ती देखील भद्रावती शहरातील असून बस स्टँड परिसरात राहणारे हे व्यक्ती हरियाणा येथून १४ जून रोजी भद्रावती येथे आले होते. फरिदाबाद येथील रहिवासी असणाऱ्या विलगीकरणातील या नागरिकाचा काल स्वॅब नमुना घेण्यात आला. आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
काल २५ जून रोजी चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी दहा बाधित आढळून आले होते. त्यापैकी ७ बाधित वरोरा तालुक्यातील होते. यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या बाधितांची संख्या ७४ झाली आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. जिल्ह्यात सध्या २६ ॲक्टिव्ह कोरोना बाधित आहेत.
चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) २४ जून ( एक बाधित ) २५ जून ( एकूण १० बाधित ) आणि २६ जून ( एकूण २ बाधित ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित ७४ झाले आहेत. आतापर्यत ४८ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ७४ पैकी अॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता २६ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

Previous articleआंदोलन :- ताडोबा बफर झोन सिमेला लागून कोळसा ब्लॉक लिलाव रद्द करण्यासाठी मनसेचे आंदोलन !
Next articleनवनियुक्त काँग्रेस जिल्हाध्यक्ष व शहर अध्यक्ष यांचा काँग्रेस पर्यावरण विभागाकडून सत्कार !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here