Home चंद्रपूर नवनियुक्त काँग्रेस जिल्हाध्यक्ष व शहर अध्यक्ष यांचा काँग्रेस पर्यावरण विभागाकडून सत्कार !

नवनियुक्त काँग्रेस जिल्हाध्यक्ष व शहर अध्यक्ष यांचा काँग्रेस पर्यावरण विभागाकडून सत्कार !

काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे व चंद्रपूर  शहर अध्यक्ष पदी रामू तिवारी यांची निवड !

चंद्रपूर प्रतिनिधी :-

महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत आल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष पद रिक्त होते व शहर अध्यक्ष म्हणून असलेले नंदू नागरकर व गावंडे गुरुजी यांची चंद्रपूर शहर अध्यक्ष म्हणून असलेली संयुक्त दावेदारी यामुळे काँग्रेस मधे नेमके पदाधिकारी आहे तरी कोण ? हा प्रश्न जनतेला पडत होता. मात्र आता त्यावर पूर्णपणे पडदा पडला असून काँग्रेस प्रदेश कमेटी प्रदेश अध्यक्ष यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांची तर शहर अध्यक्ष म्हणून रामू तिवारी यांची नियुक्ती केली आहे.
त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यात काँग्रेस संघटनात्मक द्रुष्टीने अधिक मजबूत होईल असा आशावाद काँग्रेस कमेटी पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष दिलीप पल्लेवार यांनी व्यक्त करून दोन्ही पदाधिकारी यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी काँग्रेस चे जेष्ठ कार्यकर्ते हाजी हारूण व राजू वासेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleधक्कादायक :- भद्रावती शहरात आढळले आणखी २ कोरोना बाधित रुग्ण !
Next articleसुरक्षा रक्षक कामगारांच्या वेतनाकरिता निधी उपलब्ध करून द्या, छोटूभाई यांची मागणी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here