Home वरोरा सुरक्षा रक्षक कामगारांच्या वेतनाकरिता निधी उपलब्ध करून द्या, छोटूभाई यांची मागणी.

सुरक्षा रक्षक कामगारांच्या वेतनाकरिता निधी उपलब्ध करून द्या, छोटूभाई यांची मागणी.

पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांना दिले निवेदन. 

वरोरा प्रतिनिधी :-

चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील सुरक्षारक्षक कामगारांना ३ ते ६ महिन्याची वेतन न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे आणि कोराना. महामारी लॉकडाऊन मध्ये स्थायी कर्मचाऱ्यांपेक्षाही सुरक्षारक्षक सफाई कामगार हे स्वतःचा जीव धोक्यात टाकून रात्रंदिवस त्यांच्याबरोबर काम करीत होते आणि आजही करीत आहे, त्या सर्व गडचिरोली जिल्ह्यातील कामगारांना ६ महिन्याचे व चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व सुरक्षा कामगारांना ३ ते ४ महिन्याच्या वेतनाकरिता शासनस्तरावरून वेतन निधी उपलब्ध करून देण्यात यावा. व तसेच यापूर्वी कामावरून कमी केलेल्या १०. सुरक्षा रक्षक कामगारांचे सेवा पुस्तक चंद्रपूर कार्यालयातून मंजूर करून मुंबई कार्यालयात पूर्वी.पाठवले आहे त्याला तात्काळ मान्यता देऊन यापूर्वी सेवेत असलेल्या त्या कामगारांना सेवेत घेण्यात यावे, या दोनही मागण्याकरिता राज्याचे कॅबिनेट आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार, आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई , मुख्य कामगार आयुक्त मुंबई, व जिल्हाधिकारी यांना. निवेदन पाठवून सदर मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या अन्यथा सर्व सुरक्षा रक्षक कामगारांना घेवून काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष छोटू भाऊ यांनी दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here