Home चंद्रपूर धक्कादायक :- महसूल विभागाचा भ्रष्ट खेळ आला समोर, एका स्टॉकची रेती लिलाव...

धक्कादायक :- महसूल विभागाचा भ्रष्ट खेळ आला समोर, एका स्टॉकची रेती लिलाव करून दुसरा स्टॉक गायब कसा ?

वडा घाटातील रेती तस्करी व प्रिया झामरेनी रेती तस्कराकडून घेतलेल्या खंडणीचे तार महसूल प्रशासनाशी ? रेती तस्करीचे व्हिडिओ समोर आल्यानंतर सुद्धा महसूल प्रशासनाकडून पोलिस तक्रार का नाही ?

रेती चोरी प्रकरण भाग – ३

चंद्रपूर तालुक्यातील नकोडा, चिचोली, हल्ला व वडा घाटावर जेसीपी मशीन द्वारे रेती उत्खनन करून व हाववा ने वाहतूक करून कोट्यावधिची रेती चोरी खुलेआम सुरू असताना महसूल प्रशासनातील तहसीलदार , नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी. पटवारी यांच्यासह खनिकर्म विभागाच्या अधिकारी निरीक्षक यांनी काही कारवाई वगळता इतर रेती तस्करावर कुठलीही कारवाई न करता उलट जप्त रेती साठा दोन वेळा रेती तस्कर हे चोरून नेतात व महसूल अधिकारी केवळ पोलिस स्टेशन मधे तक्रार देवून मोकळे होतात यामागे मोठा गेम असून तहसीलदार आणि रेती तस्कर यांच्यामधे एक गुप्त समझोता होऊन एका रेती साठय़ाचा माल लिलाव करायचा  व दुसरा रेती स्टॉक चोरून न्यायचा शिवाय त्याच रायल्टीचा वापर करून नदीतून बेकायदेशीर रेती उपसा करून कोट्यावधी रुपयाची रेती चोरी करायची  एवढा एककलमी कार्यक्रम घूग्गूस परिसरात सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फरवरी मधे १२ व १३ तारखेला दोन रेती स्टॉक जप्त करण्यात आले त्यात एका रेती स्टॉकच्या लिलावाची बोली १५ लाख रुपये झाली नंतर दुसऱ्या रेती स्टॉक ची वेळ असताना दुसरा रेती स्टॉक रेती तस्करानी गायब केला आणि त्या स्टॉकचा लिलाव रद्द करण्यात आला अर्थात हे सगळ नियोजनबद्ध पद्धतीने घडत असून पुनः अशीच पुनरावृत्ती ११ जून ला सुद्धा झाली आहे. यावेळी सुद्धा एक रेती स्टॉक चा लिलाव होतो आणि दुसरा स्टॉक रेती तस्कर चोरून नेतात त्यामुळे लाखोंच्या रेती लिलावातुन रॉयल्टी मिळवून कोट्यावधीची अवैध रेती उपसून ती खुल्या मार्केट विकली जाते यामध्ये तहसीलदार आणि खनिकर्म अधिकारी यांचा रेती तस्कराशी सरळ सबंध येत असून त्यांच्याच माध्यमातून शासनाच्या कोट्यावधी रुपयाच्या महसूलाची चोरी होत आहे.

प्रिया झामरे प्रकरणात तिचे विरोधात व सोबतच रेती तस्कर यांच्या विरोधात तक्रार ही स्वत महसूल विभागाने करायला हवी होती, पण या प्रकरणात जर रेती तस्करावर कारवाई झाली असती तर ते अधिकारी यांची पोल खोलणार होते. त्यामुळे महसूल विभागाकडून वडा घाटावर काढलेल्या व्हिडिओ मधे रेती तस्कर दिसत असताना सुद्धा महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. घूग्गूस नकोडा परिसरात सगळ्याच रेती तस्कराकडे जीसीपी मशीन व हायवा ट्रक आणि ट्रक्टर आहे आणि अवैध रेतीच्या साठा ते तयार करून चढ्या दराने रेतीची विक्री खुल्या बाजारात करीत आहे. मात्र हे सगळ कळून सुद्धा महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून रेती तस्कराना वाचवीण्याचा प्रयत्न होत असेल तर ह्या रेती चोरीत हे अधिकारी सुद्धा सामील असल्याचा ठपका अधिकाऱ्यांवर बसतोय तो खोटा कसा ? त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तत्काळ यावर उपाययोजना तयार करून दोषी संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी आता जनतेतून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here