Home क्राईम स्टोरी क्राईम रिपोर्ट :- शेगाव पोलिसांनी पकडली 2,20,000/- रुपयाची देशी दारू. एक आरोपी...

क्राईम रिपोर्ट :- शेगाव पोलिसांनी पकडली 2,20,000/- रुपयाची देशी दारू. एक आरोपी अटकेत तर दोन आरोपी फरार !

ग्रामीण क्षेत्रात अवैध दारू विक्रीत वाढ मात्र पोलिसांनी दारू तस्कराच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी ?

वरोरा तालुका प्रतिनिधी :

पोलिस स्टेशन शेगाव अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात नवनवे अवैध दारू वाहतूक करणारे व विक्री करणारे पोलिसांच्या रडारवर असून नुकतीच शेगाव पोलिसांना गुप्त माहिती मिळताच त्यांनी मौजा मोवाडा गावाजवळील रोडवर रेड केली असता त्यामध्ये एकूण 22 खर्ड्याच्या खोक्यांमध्ये 2200 नग बॉटल देशी दारू 90 ml अंदाजे किंमत 2,20,000/- रुपये व एक चारचाकी गाडी क.MH 34- K 1904 की.2,00,000/- असा एकुन 4,20,000/रुपयाचा मुद्देमाल जप्त करून एक आरोपीस अटक केली मात्र दोन आरोपी फरार होण्यास यशस्वी ठरले. ही कारवाई ठाणेदार बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून फरार आरोपीचा शोध पोलिस करीत आहे.

Previous articleधक्कादायक :- महसूल विभागाचा भ्रष्ट खेळ आला समोर, एका स्टॉकची रेती लिलाव करून दुसरा स्टॉक गायब कसा ?
Next articleचिंताजनक :- चंद्रपूर जिल्ह्यात आणखी सापडले ७ कोरोना बाधित रुग्ण. वाढत्या पॉझिटिव्ह रुग्णांमुळे प्रशासनाची चिंता वाढली !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here