Home चंद्रपूर क्रांती नवनिर्मिती सावरगाव चे सेवाभावी कार्य गौरवास्पद !

क्रांती नवनिर्मिती सावरगाव चे सेवाभावी कार्य गौरवास्पद !

विविध संस्थांनी केला कार्यकर्त्यांचा सन्मान !

चंद्रपूर :-

नागभिड तालुक्यातील सावरगाव येथील क्रांती नवनिर्मिती संघटन च्या वतीने कोव्हिड 19 वैश्विक माहामारीच्या आपत्कालीन परिस्थितमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता सामाजिक बांधिलकी जोपासीत कोव्हिड प्रतिबंधक विविध उपक्रम,जनजागृती व सेवाभावी कार्ये सम्पन्न केली.त्यात प्रामुख्याने,सावरगाव व वलनी इथे सेनिटायजर व मास्क वितरण,विस्थापित कुटूंबा ना तांदूळ,टिकत ,मिट,भाजीपाला व आर्थिक मदत केली.कोरोना प्रतिबंधक पत्रके गावात वाटली,भिंतीवर मीच माझा रक्षक या शीर्षका खाली व सुचनांचे फलक लिहिले आणि कोरोना जनजागृती केली.वलनी व सावरगाव इथे लॉकडाऊन मुळे अडलेल्या गरीब व गरजू लोकांचे विवाह(लग्न)लावून दिले.जि.प.प्रा.शाळा व लोक विद्यालय इथे शालेय पोषण आहार वितरण करण्यात व सरकारी स्वस्त धान्य दुकानात गर्दी होऊ नये आणि सोशल डिस्टनटिंग चे पालन व्हावे करीत धान्य वितरणात सहकार्य केले.किराणा दुकानदारांनी वाजवी दरात जीवणावशक वस्तू विकत द्यावा करिता त्यांना रेटबॉर्ड लिहून दिले.गावात शांतता,सुरक्षितता रहावी,लॉकडाऊनचे व शोशल डिस्टिंगचे पालन व्हावे करीत गाव कोरोना प्रतिबंदीत समिती सोबत मिळून कार्य व सहकार्य केले. बाहेर राज्यातून व जिल्ह्यातून आलेल्या मजुरांना व लोकांना 14 दिवस विलगिकरन करणे च्या कार्यात कोरोना समिती सोबत सहभाग घेतला व सहकार्य केले.हैद्राबाद वरून गोंदिया कडे पायदळ जाणाऱ्या मजुरांना पिण्याचे पाणी,बिस्केट पुडे व खारा चिवडा पॅकेट चे वितरण केले.ग्राम जयंती निमित्य श्री.गुरुदेव सेवामण्डल सावरगाव वतीने तेल,मिट,तिखट,साबून वितरण कार्यात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.असे विविध सेवाभावी उपक्रम क्रांती नवनिर्मिती संघटनेच्या माध्यमातून गावात व परिसरात राबविले गेले.सदर कार्याची दखल घेत अनेक ट्रस्ट व संस्थांनी कार्यकर्त्यांना सन्मानपत्राने सन्मानित केले.यात प्रामुख्याने प्राध्या. युवराज रामटेके,विनायक नेवारे,प्रशांत रामटेके,निकेश अलोणे,जितेंद्र मुंगमोडे,तुलोपचंद गेडाम,संदीप चावरे,सागर अलोणे,कुणाल शेंडे,विकास बोरकर,हितेश मुंगमोडे,कल्पना पेंदाम सरपंच,श्रीराम बोरकर उपसरपंच,रवींद्र बोरकर पोलीस पाटील,नैना गेडाम जि. प.सदस्य,लोकनाथ राऊत लिपिक,कमलकिशोर चुनारकर,सचिन कालेस्पोर इ.कार्यकर्त्यांचा सन्मान पत्राने गौरविण्यात आले.क्रांती नवनिर्मिती संघटन हे सामाजिक क्षेत्रात सेवाभावी कार्य करणारे संघटन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here