Home कोरपणा खळबळजनक :- गडचांदूर स्वीक्रुत नगरसेवक पाप्पयाच्या फेसबुक स्टेट्स वर अश्लिल चित्रफीतमुळे सर्वत्र...

खळबळजनक :- गडचांदूर स्वीक्रुत नगरसेवक पाप्पयाच्या फेसबुक स्टेट्स वर अश्लिल चित्रफीतमुळे सर्वत्र खळबळ ?

माझ्या लहान मुलाने अनवधानाने अश्लिल चित्रफीत फेसबुक वर अपलोड केल्याचा नगरसेवकाचा दावा ठरला फोल,, मोबाईल मधील अश्लिल चित्रफिती बाळगण्याचे कारण होणार लवकरच स्पष्ट !

कोरपना प्रतिनिधी :-

गडचांदूर नगरपरिषदचे स्वीक्रुत नगरसेवक तथा काँग्रेस चे जेष्ठ कार्यकर्ते पाप्पयाच्या रासलिला आता त्यांच्या फेसबुक स्टेट्स वरून शिद्ध होताना दिसत असून
गडचांदूर शहरात त्यांच्या फेसबुक स्टेट्स वरील अश्लिल चित्रफीत मोठा प्रमाणात व्हायरल झाली असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे, या संदर्भातील बातम्या काही न्यूज पोर्टल वर आल्या असून भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल वर आणखी एक धमाका येत्या काही दिवसात या प्रकारच्या घटनेचा होणार असल्याने “अब तेरा क्या होगा पा …..” अशी वेळ संबंधितांवर येण्याची शक्यता आहे. गडचांदूर शहरात गेल्या अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रात आपली पक्की पकड बनविनारे पाप्पया यांनी आपल्या स्वभावानुसार अश्लिल चित्रफीत बघता बघता व एकीकडे फेसबुक उघडे असताना फेसबुक स्टेटस वर बोट गेले आणि त्यांना कळले सुद्धा नाही, पण त्या दरम्यान रात्रितुन ती पोस्ट हजारो फेसबुक युजरनी बघितली व या पोस्ट मुळे मोठे वादंग निर्माण झाले. मात्र ही गोष्ट पाप्पया यांना तेंव्हा लक्षात आली जेंव्हा काँग्रेस च्या एका नगरसेवकाने फोन करून त्यांना सांगितले. लोकप्रतिनिधी कसा असावा ? याबद्दल एक आदर्श आचारसंहिता आहे पण जनसामान्यांत आपली सामजिक प्रतिमा मोठी आहे असे दाखवणाचा प्रयत्न करणाऱ्या पाप्पयाला अशा प्रकारचे क्रुत्य शोभा देत नाही पण ही पोस्ट माझ्या छोट्या मुलांनी खेळाच्या नादात पोस्ट झाल्याचे फेसबुक वर त्यांनी सांगितले होते, परंतु ते सर्व खोटे असून त्यांच्या मोबाईल वर अश्लिल चित्रफीत आली कुठून ? काय पुनः त्यांच्या मोबाईल वर अशाच प्रकारच्या अश्लिल चित्रफिती आहेत ? असे प्रश्न जनतेसमोर उभे राहत असून अश्लिल चित्रफिती मोबाईल वर बाळगणे हा सुद्धा गुन्हा आहे आणि त्यांनी हा गुन्हा केला असून आता सामजिक हित जौपासणारे आवाज का उचलत नाही ? आणि जे विरोधक आहे ते कुठल्या बिळात झोपले ? हे कळायला मार्ग दिसत नाही. मात्र त्यांच्या मोबाईल वर असलेल्या त्या अश्लिल चित्रफिती नेमक्या कशासाठी होत्या ? या प्रश्नाचे उत्तर खरं तर त्यांना देणे अपेक्षित आहे, पण या प्रश्नाचे उत्तर ते देवू शकत नाही कारण आता या नंतर काही काळातच याचे उत्तर समोर येणार आहे. पाप्पया चे राजकीय अस्तित्व संपविण्याच्या या घटने पासून इतरांनी सबक शिकायला हवे ते गडचांदूर नगरपरिषद चे एक पदाधिकारीच बातमी कुठे येऊ नये याकरिता प्रयत्नशील असून एवढे घेऊन जा अशी खुली ऑफर देत असल्याची माहिती सकाळीच प्रसारमाध्यमांकडे आली मात्र गडचांदूर नगरपरिषदमधे अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी असेल तर त्या नगरपरिषदचे काय होईल ? असा गंभीर प्रश्न, सर्वसामान्य नगरवाशियाना पडला आहे . आता या प्रकऱणा संदर्भात  शहरात व कोरपणा तालुक्यात मोठी चर्चा रंगत असून आता पाप्पया यांच्यावर काँग्रेस वरिष्ठ पदाधिकारी नेमकी काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Previous articleक्रांती नवनिर्मिती सावरगाव चे सेवाभावी कार्य गौरवास्पद !
Next articleखळबळजनक :- वरोरा शहरात एकाच कुटुंबात ४ तर इतर एक; कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here