Home कोरपणा कोरपना नगरपंचायतकडून व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई ।

कोरपना नगरपंचायतकडून व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई ।

प्रमोद गिरडकर कोरपना प्रतिनिधी:- 

कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे दिशा निर्देशांचे पालन न करता हॉटेलमध्ये पार्सल सुविधा न देता हॉटेलमध्येच बसवून खाद्यपदार्थ देत असताना तीन हॉटेल व्यावसायिकावर तसेच चौदा विना मास्क वापर करणार्या नागरिकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.ही कारवाई सोमवार दिनांक 29 ला करण्यात आली.
सदर कारवाई कोरपना नगरपंचायत मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नंदलाल राठोड, मयूर कांबळे, रवी माजरे, दिगंबर दुर्गमवार, सुरज भगत, विकास आमलेपवार व पोलिस विभागाचे विनोद पडवळे ,रमेश वाकडे आदी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या कारवाई त एकूण 5800 रुपयाचा दंड वसु ल करण्यात आला.
नगरपंचायत च्या धडक जनजागृती
मोहिमेमुळे आज गायत पर्यंत कोरपना शहरात एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. त्यामुळे कोरपना नगर पंचायत ची एक जागरूक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळख निर्माण झाली आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासूनच योग्य नियोजनामुळे आज पर्यंत शहरात कोरोना रुग्ण आढळला नाही. नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करून अनावश्‍यक घराबाहेर पडू नये, सर्वांनी मास्क चे वापर आणि सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे , व्यापारीबांधवानी वेळेचे बंधन पाळावे(9 ते 5), जोपर्यंत संपूर्ण कोरोना मुक्ती होणार नाही व पुढील शासनाचे दिशानिर्देश प्राप्त होणार नाही.
तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे मुख्याधिकारी गायकवाड यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here