Home चंद्रपूर खळबळजनक :- मुलानेच केल्या आपल्या बापाचा खून, लॉक डाऊनच्या काळातील खळबळजनक घटना...

खळबळजनक :- मुलानेच केल्या आपल्या बापाचा खून, लॉक डाऊनच्या काळातील खळबळजनक घटना !

आई व बहिणीला वडिलांनी त्रास दिल्याचा राग अनावर झाल्याने मुलाने आपल्या बापालाच संपविले!

चंद्रपूर प्रतिनिधी :-

तालुक्यातील चोरगाव येथील श्रावण चौधरी, त्याचा मुलगा नागेश चौधरी आणि पत्नी व मुलगी असा परिवार राहत होता, खरं तर मुलगी नागपूरला व मुलगा सुद्धा बाहेर शहरात कामासाठी राहत होता पण लॉक डाऊन च्या काळात मुलगा आणि मुलगी आई बाबा कडे मागील तीन महिन्यापासून एकत्र राहत होती. दरम्यान श्रावण चौधरी हा आपल्या पत्नीला व मुलीला वारंवार शिव्या देवून मानसिक व शारीरिक त्रास द्यायचा त्यामुळे काल दिनांक ५ जुलै ला दुपारी मुलगा नागेश याचा वडिलांच्या या भांडणामुळे राग अनावर झाल्याने त्याने घरातील कुर्हाडीने आपल्या बापाच्या डोक्यावर वार करून जागीच ठार केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी नागेश चौधरी याला अटक केली असून अधिक तपास दूर्गापूर पोलिस करीत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here