Home चंद्रपूर सुवर्णसंधी ;- चंद्रपूर येथे मशरूम लागवड व प्रकिया यावर प्रशिक्षणाचे आयोजन !

सुवर्णसंधी ;- चंद्रपूर येथे मशरूम लागवड व प्रकिया यावर प्रशिक्षणाचे आयोजन !

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचा अभिनव उपक्रम !

महाराष्ट्र उद्दोजकता विकास केंद्र ही उदयोग संचालनालयाअंतगर्त कार्यरत व महाराष्ट्र शासन पुरस्कृत स्वायत्त प्रशिक्षण संस्था असून या संस्थेचा मुख्य उद्देश विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करून जास्तीत जास्त लोकांना स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरु करणेकरिता प्रेरित करणे व उद्योजकतेला पूरक असे वातावरण निर्मित करणे हा आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र चंद्रपूर द्वारे 7 वी पास व 18 वर्ष पूर्ण असलेल्या युवक युवतीकरिता दि. 16/07/2020 ते 18 /07/ 2020 ( 3दिवस ) कालावधीचे मशरूम लागवड व प्रकिया प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
सदर प्रशिक्षणामध्ये मशरूम चे प्रकार व ओळखलागवड, साहित्य व कच्चा माल, काळजी व देखभाल, मशरूम काढणे,वाढविणे, व पॅकेजिंग प्रकिया, रोग कीड, निदान व उपचार, खाद्य पदार्थ, व अर्थशास्त्र, बाजार पेठ पहाणी, तसेच विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन, इत्यादी विषयावर विशेष तद्य व शासकीय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षणातप्रवेश घेण्याकरिता इच्छुक युवक युवतीने त्वरित दि. 15/7/2020 पर्यंत ” महाराष्ट्र उद्योजकता प्रशिक्षण विकास केंद्र ” उद्योगभवन, दुसरा माळा, गाळा क्र. 208, बस स्टॉप समोर, रेल्वे स्टेशनं रोड, चंद्रपूर, येथे स्वतःचा बायोडाटा, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, आधार कार्ड, व दोन पासपोर्ट साईज फोटो घेऊन हजर रहावे, अधिक माहिती करिता श्री. के. व्ही. राठोड, प्रकल्प अधिकारी, मो. नं. 9403078773, 07172- 274416 व श्री. मिलिंद कुंभारे, कार्यक्रम आयोजक कु. लक्ष्मी खोब्रागडे मो. नं. 9309574045 यांच्याशी संपर्क साधावा, असे निवेदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here