Home वरोरा मंदिराच्या दानपेट्यातील पैसा  चोरणाऱ्यांना पाठिशी घालणाऱ्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांचेवर कारवाई करा...

मंदिराच्या दानपेट्यातील पैसा  चोरणाऱ्यांना पाठिशी घालणाऱ्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांचेवर कारवाई करा !

धर्मादाय आयुक्त  कार्यालयातील निरीक्षक मडावी यांचा देवस्थानातील ठेक्याचे धान विकण्याचे फर्मान ! विठ्ठल-रुक्मिनी देवस्थान भटाळा विश्वस्तांची धर्मादाय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार !

चंद्रपूर (का.प्र.)
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील भटाळा येथील अति प्राचिन भवानी देवी शंकर देवालय आणि विठ्ठल-रुक्मिनी देवस्थान च्या कमेटीची निवडणुक मागील अनेक वर्षापासून रखडली असतांना जुन्या अध्यक्षांनी २००५ पासून संस्थेच्या घटनेनुसार निवडणुक प्रक्रिया न राबविता एकतर्फी कारभार चालविला होता. या दरम्यान सहाय्यक धर्मादाय आयुक्त रामचंद्र चव्हाण यांनी दि. २४/१०/२०१७ रोजी आदेश पारित करून संस्थेच्या घटनेनुसार  तीन महिन्याच्या कालावधीत संस्थेच्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संस्थेच्या विश्वस्तांची निवडणुक प्रक्रिया पुर्ण करण्यात आली व तसा बदल अर्ज विहीत नमुन्यात सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल करण्यात आला. परंतु संस्थेचे तात्पुरते कोषाध्यक्ष आड्कु नथ्थु तुमराम यांनी आक्षेप अर्ज सादर केला. त्यामुळे सदर प्रकरण सहाय्यक धर्मादाय कार्यालयात प्रलंबित आहे. परंतु संस्थेचे अध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकारी हे बहमताने निवडून आल्यानंतर सुद्धा विद्यमान धर्मादाय आयुक्त यांनी नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी नवनियुक्त कार्यकारी मंडळानी अर्ज सादर केल्यानंतर सुद्धा मंजुरी न देता सदर प्रकरण प्रलंबित ठेवले. मात्र त्यानंतर या उत्सवाकरीता धर्मादाय आयुक्त यांनी एका निरीक्षकाची नियुक्ती करून सदर उत्सव त्यांचे देखरेखीत साजरा करण्याचे पत्र दिले होते. परंतु त्या मागणीची सुद्धा पुर्तता सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी केली नाही, त्यामुळे सदर नवरात्रोत्सव अध्यक्ष व सचिव यांनी स्वखर्चाने साजरा केला व त्या खर्चाचा अहवाल पावती व पुराव्यानिशी धर्मादाय आयुक्त यांचेकडे सादर केला. परंतु ‘मंदिर तुमच्या बापाचे समजता काय? मी तुम्हाला जेलमध्ये टाकतो आणि तुमचे पद रद्द करतो तसेच तुमच्याविरोधात दंडात्मक कारवाई करतो’ अशा अवच्च्य भाषेत अध्यक्ष व सचिव यांच्या विरोधात सहाय्यक धमादाय आयुक्त यांनी शब्द प्रयोग केला व अपमानित केले.
दरवर्षी भवानी देवी शंकर देवालय येथे महाशिवरात्रीचा मोठा कार्यक्रम लाखोंच्या संख्येने होत असतो.
त्याकरीता विश्वस्त मंडळाद्वारे नियोजन करणे आवश्यक आहे. परंतु सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी आपला हेकेखोरपणा ठेवून हा उत्सव साजरा करण्याकरीता कार्यकारी मंडळाला अधिकार दिले नाही. उलट विश्वस्तांना वगळून महाशिवरात्रीचा कार्यक्रम आयोजित करण्याकरीता अपरिचित व या देवस्थानाची कुठलाही संबंध नसलेल्या बारा लोकांची समिती नेमली व त्यांना या कार्यक्रमाची जबाबदारी सोपविली. खरेतरं घटनेनुसार विद्यमान नवनियुक्त कार्यकारीणी असतांना इतरांची कनेटी नेमणे हे नियमबाहा व घटनाबाह्य आहे. तरीही त्या कमेटीला अधिकार देऊन कार्यक्रमाचा आर्थिक अहवाल पावतीसह निरीक्षक म्हणून निवडण्यात आलेल्या
 मडावी यांचेकडे सुपूर्द करण्याचा आदेश दिला व सोबतचं दानपेटीत जमा झालेले पैसे बँकेत जमा करण्यासंद्भात सुद्धा निर्देश दिले होते. परंतु महाशिवरात्रीच्या कार्यक्रमामध्ये दानपेटीमध्ये देणगी म्हणून गोळा झालेले सुमारे दिड लाख रूपये धर्मादाय आयुक्तांनी नेमलेल्या कमेटीने दानपेटी फोडून परस्पर काढून आपसात रकम वाटून घेतल्याच्या धक्कादायक प्रकार घडलेला आहे. असे असतांना सुद्धा सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांचेकडे देवस्थानातील पेट्या फोडून रक्कम हडप केल्याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर सुद्धा सहाय्यक धर्मादाय आयुक्त व निरीक्षक रोशन मडावी यांनी त्या बारा लोकांवर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालून सचिवाला सुडबुद्धीने २५/०२/२०२० रोजी चौकशीचा नोटीस देवून सुनावले व ‘मंदिर काय तुमच्या बापाचे आहे? तुमच्यावर दहा हजार रूपये दंड आकारते. असे चिडून सहाय्यक आयुक्तांनी उद्धट वागणुक दिली. खरं तर कार्यालयातील निरीक्षक मडावी यांनी संपूर्ण आर्थिक व्यवहाराची चौकशी करून तसा अहवाल सहाय्यक आयुक्ताना द्यायला हवा होता. परंतु लाखोची अफरातफर केल्यानंतर सुद्धा त्या कमेटीतील बारा लोकांना मोकाट सोडून उलट विद्यमान सचिव चिंधुजी रामचंद्र बावणे यांना बळजबरीने संस्थेच्या बँकेतून पैसे काढून कमेटीच्या दारा लोकांना पैसे द्या, असे दोनदा दिलेल्या पत्रामध्ये वेग्वगळ्या रक्कमेच्या संदर्भात सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी आदेश दिले. जे घटनाबाह्य असून ज्याअर्थी कनेटीच्या बारा लोकांनी खर्चाचा अहवाल सादर केला नाही व कुठलेही बिल विद्यमान सचिवांकडे सादर केले नाही. एवढेच नव्हे तर सहायक धर्मादाय आयुक्त त्या कमेटिच्या खर्चाचा अहवाल देण्यास तयार नाही त्याअर्थी त्यांना कुठल्या निकषावर संस्थेच्या खात्यातील पैसे काढून द्यायचे हा सवाल असून भवानी शंकर देवालय आणि विठ्ठल रुक्मिनी देवस्थान या दोन ही मंदिराच्या दानपेट्या चोरीमध्ये कमेटीच्या बारा लोकांचा हात आहे व म्हणूनच निरीक्षक मडावी यांनी मंदिराच्या शेतातील धान विकून पुनः १२ लोकांच्या कमेटिला बेकायदेशीर पैसे देण्याचा घाट घातला आहे व म्हणूनच निरीक्षक मडावी सह सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांना सुद्धा त्याचा काही वाटा मिळाला असल्याची संभावना आहे. त्यामुळे त्यांच्यावर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व घटनेनुसार ऑन कॅमेरा कार्यकारी मंडळाची निवड झाली त्यांना सर्व अधिकार विश्वस्तांना देऊन ऐतिहासिक मंदिराच्या धार्मिक व पारंपारिक उत्सवाला चालना द्यावी अशी मागणी नवनियुक्त अध्यक्ष व सचिव यांनी धर्मादाय आयुक्त मुंबई व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना दिलेल्या तक्रारीमध्ये केली आहे. या संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत देवस्थान संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ जाधव . सचिव चिंधू रामचंद्र बावने. उपाध्यक्ष मारोती पत्रुजी बरडे. कोषाध्यक्ष रमेश पांडुरंग तूमसरे. सह सचिव नत्थु ताणबा तूमसरे सदस्य नानाजी अर्जुन जांभूळे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, राहुल गौरकार, कविता गौरकार,सामजिक कार्यकर्त्या सरिता मालू. भटाळा ग्रामपंचायत च्या सरपंच सौ मनीषा कांबळे  उपस्थित होत्या.
Previous articleदुःखद वार्ता :- भद्रावती येथील नृत्यकलाकार किरण गेडाम यांचा नाल्यात पडून दुर्दैवी मृत्यू .
Next articleसुवर्णसंधी ;- चंद्रपूर येथे मशरूम लागवड व प्रकिया यावर प्रशिक्षणाचे आयोजन !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here