Home कोरपणा चिंताजनक :- अनेक परिवाराच्या घरकुलाचे स्वप्न भंगले, अनुदाना विना घर अधुरे, 

चिंताजनक :- अनेक परिवाराच्या घरकुलाचे स्वप्न भंगले, अनुदाना विना घर अधुरे, 

पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना त्वरित अनुदान द्या नगरसेवक अरविंद डोहे यांची शासनाकडे मागणी.

गडचांदूर –

गडचांदूर शहर हे कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे शहर असून या शहराला औधोगिक शहर म्हणून सम्पूर्ण राज्यात ओळख आहे.या शहराचा आजूबाजूला सिमेंट कम्पनी असल्याने या शहरात मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग स्थायी झाले. तुटपुंजी पगारात आपल्या झोपड्या ,कच्चे घर बांधून आपल्या कुटुंबासह राहत आहे.
अश्यातच राज्य शासन व केंद्र शासन यांच्या संयुक्त योजनेतून पंतप्रधान आवास योजना सर्विकडे लागू केले व ज्यांना घर नाही अश्या सर्वाना घर देण्याचा निर्णय घेतला लोकांनी फॉर मोठ्या उत्साहाने त्या निर्णयाचे स्वागत केले व नगर परिषद गडचांदूरला मागील तीन वर्षां पूर्वी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत अंदाजे १२०० लाभार्थाने अर्ज केले. त्यापैकी पहिला डीपीआर केवळ ७७ लोकांचे नावे घरकुल मंजूर करण्यात आले.व ३५ लाभार्थानी रीतसर नगर परिषद कडून बांधकाम परवानगी घेऊन आर्थिक परिस्थिती हालाकीची असताना शासनाकडून अनुदान मिळतीलच अश्या आशेने आपले राहते घर खोलून उसनवारी,खाजगी कर्ज घेऊन घरबांधकाम चालू केले.अश्यातच कोरोनाचे संकट आले सर्व देश लॉक डाऊन झाला घराचे बाहेर निघण्यास मनाई घर बांधकाम अधुरे राहिले उपासमारीची वेळ आली.मागील एक वर्षा पासून अनुदान मिळाले नाही.ज्या लाभार्थाचे बांधकाम स्लॅब लेव्हल पर्यंत आले.आता पावसाळा चालू आहे.जर मोठा पाऊस पडला तर त्या भिंतीही कोसळू शकते व एक नवीन संकट येऊ शकते.घर खोलून राहण्याकरीता तात्पुरते
घर भाड्याने घेतले.त्यांचे भाडे देणे,बांधकामास घेतलेले उसनवारी ,कर्जाची रक्कम वापस द्यायची कुठून अश्या द्विज भूमिकेत हा लाभार्थी सापडला असून आता ही सरकारी योजना नकोरे बाबा म्हणण्याची वेळ आली आहे.
मोठ्या आशेने नवीन घराचे स्वप्न पाहले परन्तु ते अधुरेच राहिले तेव्हा शासनाने या लाभार्थ्यां ना त्वरित अनुदान देण्याची मागणी करीत आहे. तसेच नगर परिषद मध्ये हजारो लाभार्थ्यांनी अर्ज केले असून दुसरा डीपीआर अजूनही मंजूर झालेला नसल्याचे नगर परिषद कडुन सांगण्यात येत आहे कित्येक लोकांच्या झोपड्या मोळकळीस आल्या असून घरकुल भेटतील या आशेने आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात टाकुन कसेबसे दिवस काढित आहे. तरी शासनाने याकडे गाभिर्याने लक्ष घालून जुन्या लाभार्थ्यांना अनुदान द्यावे व नवीन मागणी करणाऱ्या लाभार्थाना घरकुल मंजूर करावे अशी मागणी नगरसेवक अरविंद डोहे यांनी केली आहे.

Previous articleसुवर्णसंधी ;- चंद्रपूर येथे मशरूम लागवड व प्रकिया यावर प्रशिक्षणाचे आयोजन !
Next articleप्रेरणादायी :- पानटपरी चालवणाऱ्या अत्यंत गरिबांच्या मुलाने मिळविले घवघवीत यश.  विद्यालयातुन टॉप कु नर्मथा प्रथम तर अरुण कुमार द्वितीय 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here