Home भद्रावती प्रेरणादायी :- पानटपरी चालवणाऱ्या अत्यंत गरिबांच्या मुलाने मिळविले घवघवीत यश.  विद्यालयातुन टॉप...

प्रेरणादायी :- पानटपरी चालवणाऱ्या अत्यंत गरिबांच्या मुलाने मिळविले घवघवीत यश.  विद्यालयातुन टॉप कु नर्मथा प्रथम तर अरुण कुमार द्वितीय 

केंद्रीय विद्यालय माजरीच्या कॉमर्स चा निकाल शंभर टक्केदोघांनाही बनायचं आहे चार्टर्ड अकाउंटन.

माजरी :- भद्रावत्ती उपसंपादक

सिबीएससी 12 वी चा निकाल लागला असून यात वाणिज्य शाखेचे निकाल केंद्रीय विद्यालय न्यू माजरी चे शंभर टक्के निकाल लागले असून यात कु नर्मथा आरमुगम हिने 97.3 टक्के घेऊन प्रथम क्रमांक घेतला आहे तर पानटपरी चालवून गुजारा करणाऱ्या गरिबांचा मुलगा अरुण कुमार वेदप्रकाश प्रसाद यांनी 92.2 टक्के घेऊन माजरी चे नाव उंचावले. त्यात कुमारी नर्मथा ही वेकोली चे मायनिंग  मॅनेजर  यांची मुलगी आहे ,
केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य दिवाकर मिश्रा यांनी दिलेल्या माहिती नुसार वाणिज्य शाखेत बारावीत शंभर टक्के निकाल लागला आहे यात एकूण 14 विद्यार्थी होते सर्व च उत्तीर्ण झाले यात कु नर्मथा आरमुगम हिने 97.3 टक्के तर अरुण कुमार वेदप्रकाश प्रसाद यांनी 92.2 टक्के घेऊन घेतले आहे आणि मिताली उपाध्ये हिने 82 टक्के घेतले नर्था आणि अरुण दोघांनाही वाणिज्य शाखेतून शिक्षण घेऊन चार्टर्ड अकाउंटट व्हायचे आहे. अरुण कुमार अत्यंत गरिबांचा मुलगा आहे त्यांचे वडिलांची लहानशी पानटपरी ची दुकान आहे अरुण ने प्राविण्य प्राप्त केल्याने माजरीत आनंदाचे लाट आहे.तसेच विज्ञानाच्या शाखेत मिशाल चंद्रा व संपदा पाटील या दोघांना 87.2 टक्के घेऊन केंद्रीय विद्याला याचे नाव रोशन केले आहे. विज्ञान शाखेत एकूण16 विद्यार्थी होते याचा निकाल 93.2 टक्के लागला आहे.

Previous articleचिंताजनक :- अनेक परिवाराच्या घरकुलाचे स्वप्न भंगले, अनुदाना विना घर अधुरे, 
Next articleधक्कादायक :- चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या २०० पार, पुनः जिल्ह्यात ६ रुग्णाची भर,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here